बातम्या

पन्हाळा राज्यस्तरीय चित्रकले स्पर्धेचे चांगलाच प्रतिसाद.

Good response to Panhala State Level Painting Competition


By nisha patil - 9/22/2024 8:22:49 PM
Share This News:



पन्हाळा किल्ल्याला जागतिक वारसा नामांकन मिळविताना किल्ल्यांसह भोवतालच्या परिसराबाबत आत्मीयता वाढावी, यासाठी आता लोकसहभाग घेण्याचा निर्णय पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेने घेतला आहे. यात ग्रामस्थ, विद्यार्थ्यां यांचा सहभाग घेण्यात येणार असून किल्ल्यांसंदर्भात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये आज महत्त्वाची  चित्रकला स्पर्धा ला आज चांगलाच प्रतिसाद मिळाला. तसेच असे अनेक ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी स्पर्धा माध्यमातून शाळांना बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रभरातून पन्हाळगडावर चित्रकले स्पर्धेसाठी सकाळी आठ वाजल्यापासून गर्दी झाली होती. तर काही स्पर्धक कालच येऊन राहिले होते.
       

  'युनेस्को' ने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड-किल्ले हे जागतिक वारसा दर्जासाठी  मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पने खाली नामांकित केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूचा जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.तसेच त्यामध्ये  पन्हाळा  किल्ल्याचा समावेश आहे. याबाबत  ५ ऑक्टोबर दरम्यान 'युनेस्को'ची समिती पन्हाळगडावर भेट देणार आहे. 
 

या अनुषंगाने राजस्तरीय भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा १८ वर्षावरील होती. वरील स्पर्धा आज पार पडली या स्पर्धेसाठी ३५६ जाणारी सहभाग नोंदवला सर्वच स्पर्धकांचे चित्र व कला पाहण्यासारखी कलाप्रेमी यांची गर्दी झाली होती. महाराष्ट्रातील कोन्या कोपऱ्यातील स्पर्धकानी यामध्ये भाग घेतला, तर चित्रांसाठी पन्हाळा गडावरील कोणतेही ऐतिहासिक स्थळ निवडाचे होते. स्पर्धा नगरपरिषद कार्यालय या ठिकाणी झाली. तर स्पर्धक प्रत्येक ऐतिहासिक इमारती जवळ चित्र काढत असताना दिसत होते. येणारे पर्यटक चित्रकला काढत असताना उत्सुकता ने पाहत होते. तसेच अचानक पाऊस आल्यामुळे स्पर्धका मध्ये थोडी धावपळ उडाली होती. तर भर उन्हात काही चित्रकार चित्र काढत असताना पाहण्यास मिळत होते. तसेच पन्हाळा  नगरपरिषदेने स्पर्धकाची चांगली सोय केली होती. प्रत्येक सहभाग घेणाऱ्या स्पर्धकाला एक टी-शर्ट ,पाण्याची बॉटल सकाळी आल्यावरच चहा , नाश्ता दुपारी जेवण खाण्यासाठी फळ प्रत्येक ठिकाणी दिले होते. त्यावेळेस स्पर्धक ही खुश होते. निकाल २ ऑक्टोंबर अगोदर घोषित करण्यात येईल. बक्षीस वितरण २ ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
           

   विनय कोरे यानी, प्रत्येक ठिकाणी स्पर्धकांशी जाऊन संवाद साधला.तसेच त्यानी नगरपालिके कार्यालय मध्ये सांगितले की, पुढच्यावेळी आपण देशपातीवर ही स्पर्धा भरवू तसेच स्पर्धकांची राहायची सोय करू,बक्षीस याच्यापेक्षा मोठे ठेवू, कारण या वेळी आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.अशा स्पर्धा व्हायला पाहिजे. कलाकारांना त्यांची कलेची दाद मिळाली पाहिजे. असे त्यांनी  नगरपरिषद कार्यालय मध्ये मत व्यक्त केले.
               

 हे सर्व चित्र पुढच्या आठवड्यामध्ये मयूर उद्यान  या ठिकाणी  कलाप्रेमींना एकत्र पाहण्यासाठी ठेवण्यात येतील.याचा लाभ कलाप्रेमीनीं घ्यावा असे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,चेतनकुमार माळवी यांनी सांगितले.  नगरपरिषदेचे कर्मचारी,अमित माने, सुहास भोसले, विश्वास रामाने, नंदकुमार कांबळे, आधी उपस्थित होते.
 

    तसेच यावेळी माजी नगराध्यक्ष विजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष, रवींद्र धडेल, चैतन्य भोसले, माजी नगरसेवक अवधूत भोसले, नियाज मुल्ला,अख्तर मुल्ला, राहुल भोसले, सचिन पाटील, राम गोसावी, पृथ्वीराज भोसले,आधी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
 


पन्हाळा राज्यस्तरीय चित्रकले स्पर्धेचे चांगलाच प्रतिसाद.