बातम्या

भागीरथी नागरी पतसंस्थेला महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षांची सदिच्छा भेट...

Goodwill visit of President of Maharashtra Cooperative Credit Union to Bhagirathi Urban Credit Institution


By nisha patil - 11/1/2025 10:39:47 PM
Share This News:



भागीरथी नागरी पतसंस्थेला महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षांची सदिच्छा भेट...

महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष कोयते यांनी केले पतसंस्थेचे कौतुक...

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा. श्री. काकासाहेब कोयटे व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थेचे महासचिव मा. श्री. शशिकांत राजोबा यांनी भागीरथी नागरी पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे जनरल मॅनेजर मा. पृथ्वीराज महाडिक यांनी कोयटे साहेब व राजोबा साहेब यांचे स्वागत केले. 

याप्रसंगी मा. कोयटे साहेब यांनी पतसंस्थांचे प्रगती,योग्यवीन कार्यपद्धती, सहकार क्षेत्रातील अभ्यास याबाबत योग्य मार्गदर्शन यावेळी दिले. नागरी पतसंस्था या नवउद्योजकांना आर्थिकदृष्ट्या पाठबळ देतात. त्यामुळे उद्योग क्षेत्राकडे महिला व तरुण वर्ग आकर्षित होऊ लागला ही आनंदाची बाब आहे. याबद्दल कोयटे  यांनी भागीरथी नागरिक पतसंस्थेचे कौतुक केले. 

राज्यसभा खासदार आदरणीय धनंजय महाडिक साहेब व संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. तसेच संस्थेच्या सद्यस्थितीबद्दल मा. पृथ्वीराज महाडिक यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी मा. शिवराज मगर, मॅनेजर मा. नासिर मुजावर, मा. अरविंद पाटील, मा. नीलम नलवडे तसेच भागीरथी पतसंस्था कर्मचारी उपस्थित होते.


भागीरथी नागरी पतसंस्थेला महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षांची सदिच्छा भेट...
Total Views: 60