बातम्या

इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 5 मार्चपर्यंत अर्ज करा

Government Hostel under Other Backward Bahujan Welfare Department  Apply for admission by March 5


By nisha patil - 2/3/2024 12:37:27 PM
Share This News:



इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यामध्ये मुलांचे एक शासकीय वसतिगृह कार्यान्वित करण्यात आलेले आहे. केंद्र शासनाच्या योजनेनुसार या वसतिगृहामध्ये 100 विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया यावर्षी ऑफलाईन पध्दतीने होणार आहे. ऑफलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून इच्छुकांनी दिनांक 5 मार्च 2024 पर्यंत ऑफलाईन अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक सचिन साळे यांनी केले आहे.

 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, आरोग्य इत्यादी सोईसुविधायुक्त निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. वसतिगृहात गुणवत्तेनुसार व विहित टक्केवारीनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृहामध्ये इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर घटकातील जसे इमाव ४८, विजाभज २६, विमाप्र ५, अनुसूचित जाती ७, अनुसूचित जमाती ४, अपंग ५, अनाथ २, खुला ३  अशा एकूण १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असेही श्री. साळे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.


इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 5 मार्चपर्यंत अर्ज करा