बातम्या
दोन मुलांपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांची सरकारी सुविधा होणार बंद...?
By nisha patil - 8/1/2024 4:15:17 PM
Share This News:
नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक रणधुमाळी एप्रिल मे महिन्यात होत आहे. त्यामुळे यंदा अंतरिम बजेट सादर करण्यात येणार आहे. येथे एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमन अंतिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
लोकसभा निवडणूक असल्यामुळे अर्थसंकल्पात योजना आणि सवलतीची पाऊस पडण्याची शक्यता आहे या अर्थसंकल्प संदर्भात लोकांची मते मागण्यात आली आहे. यावेळी जनतेकडून अनेक सूचना आल्या आहेत त्यात महत्त्वाची सूचना म्हणजे दोन पेक्षा जास्त मुले असल्यास सर्वच सवलती रद्द करण्याची आहे. दोन पेक्षा जास्त मुली असल्यास संबंधित व्यक्तीला कोणत्याही प्रकारची सबसिडी दिली जाऊ नये कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ त्या व्यक्तीला जाऊ नये. त्याची पदोन्नती रोखण्यात यावी. त्याला निवडणूक लढवण्यावर बंदी आणावी तसेच त्याला सरकारच्या कोणत्याही पुरस्कार दिला जाऊ नये. मनाच्या स्क्रॅप पॉलिसी संदर्भात सूचना आली आहे. वाहने 15 ऐवजी वीस वर्षांनी स्क्रॅप करण्याची सूचना करण्यात आली. जनतेने गृह कर्ज संदर्भात मागणी केली आहे. मागील वर्षी देशात पाच लाख घरांची विक्री झाली होती. पुढील वर्षी अशी विक्री राहणार आहे त्यामुळे कर्ज ग्रहावर देण्यात येणारी घरातील सूट दोनकांवरून पाच लाख करण्यात यावी.
हाउसिंग प्रोजेक्टसाठी सिंगल विणणे प्रणाली आली पाहिजे. निवृत्तीनंतर कॅन्सट्रॅकवर सरकारी नोकरी करणाऱ्यांना पेन्शन दिले जाऊ नये. अशी सूचना आहे. पेट्रोल डिझेल आणि गॅसची किंमत कमी करण्याची मागणी काही जणांनी केली आहे. वरिष्ठ नागरिकांना रेल्वे सेवेतील सवलत पुन्हा सुरू करा. वरिष्ठ नागरिकांसाठी तीर्थ यात्रा योजना करा, तत्काळ तिकीट कन्फर्म मिळाला हवे. मुंबई ,कोलकत्ता ,बंगलोर, हैदराबाद, अहमदाबाद शहरात हायस्पीड ट्रेन सुरू करण्याची मागणी केली आहे.
आता या जनतेच्या मागणीला सरकार काय निर्णय घेते याकडे जनतेचे लक्ष लागू राहिले आहे.
दोन मुलांपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांची सरकारी सुविधा होणार बंद...?
|