विशेष बातम्या

शासन आपल्या दारी अभियानांतर्गत गांधी मैदानात भव्य सभेचे आयोजन : राजेश क्षीरसागर

Government organizes grand meeting at Gandhi Maidan under its Dari Abhiyan Rajesh Kshirsagar


By nisha patil -
Share This News:



.निधीसह योजना आहे, पण पात्र व्यक्तीस त्याचा पत्ताच नसतो. योजनेवर मग पाणीच फेरले जाते. हे टाळण्यासाठी राज्य शासनाने “जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची” हा उपक्रम सुरू केला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कागदपत्रांसह हेलपाटे घालावे लागण्याची बाब नवी नाही. राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला व्हावा, यासाठी "शासन आपल्या दारी" हे राज्यस्तरीय अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून  राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २८ मे रोजी शहरातील मध्यवर्ती महात्मा गांधी मैदानात सायंकाळी ५.०० वाजता भव्य सभा होणार असल्याची माहिती राज्य नियोज मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासंदर्भात शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्राथमिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण राज्य शासनाच्या विविध योजना गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ठ आहे. याकामी जिल्ह्यात शिवदूतांची नेमणुकीचे काम अंतिम टप्प्यात असून, शिवदूत आणि शासन यांच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविल्या जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून ७५ हजार पेक्षा जास्त नागरिकांना या अभियानातून लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख सुजितभाऊ चव्हाण, जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, समन्वयक जयवंत हारूगले, शहरप्रमुख रणजीत जाधव,  महेंद्र घाटगे, प्रा.शिवाजीराव पाटील, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे, संजय संकपाळ आदी उपस्थित होते.


शासन आपल्या दारी अभियानांतर्गत गांधी मैदानात भव्य सभेचे आयोजन : राजेश क्षीरसागर