विशेष बातम्या
शासन आपल्या दारी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज
By nisha patil - 10/6/2023 5:05:30 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी राज्य शासन 15 एप्रिलपासून राज्यातील सर्व जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी' उपक्रम राबवत आहे. या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात 1३ जून रोजी तपोवन मैदानावर हा कार्यक्रम घेण्यात येत असून, जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियुक्त केलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत कार्यक्षमपणे पूर्ण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयातून आलेले जनकल्याण कक्षाचे समन्वयक तथा मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव डॉ. अमोल शिंदे व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, प्रत्येक विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थी शोधून त्यांना आवश्यक असलेल्या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तपोवन मैदानावर होणाऱ्या या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन सज्ज असून हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी आदर्शवत ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली
शासन आपल्या दारी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज
|