बातम्या

आदल्या दिवशीच रावण दहन आटोपून घ्या, असं सरकारचं फर्मान

Govt decreed that the burning of Ravana should be completed on the previous day itself


By nisha patil - 10/21/2023 1:38:24 PM
Share This News:



आदल्या दिवशीच रावण दहन आटोपून घ्या, असं सरकारचं फर्मान 

शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार

 प्रभू राम केवळ मतांसाठीच हवे आहेत काय? असा संतप्त काँग्रेसचा सवाल 

शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार आहे. या मैदानात दरवर्षी रामलिला होत असते. दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी रावण दहन केलं जातं. मात्र, शिंदे गटाचा मेळावा असल्याने दसऱ्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे नवमीलाच रावण दहन आटोपून घ्या, असं आदेश राज्य सरकारने रामलिला आयोजकांना दिलं आहेत यावरून काँग्रेस संतप्त झालेले दिसून येत आहे.

रावण दहनाच्या मुद्द्यावरून आता काँग्रेस आणि राज्य सरकार आमनेसामने आले आहेत. शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार असून. या मैदानात दरवर्षी रामलिला होत असते. दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी रावण दहन केलं जातं. मात्र, शिंदे गटाचा मेळावा असल्याने दसऱ्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे नवमीलाच रावण दहन आटोपून घ्या, असं फर्मानच राज्य सरकारने रामलिला आयोजित करणाऱ्यांना बजावलं  त्यामुळे यावर  काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. सरकारला प्रभू राम केवळ मतांसाठीच हवे आहेत काय? असा संतप्त सवाल काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे. सरकारच्या या निर्णयावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच हा निर्णय मागे घ्या, नाही तर परिणामांना सामोरे जा, असा कडक इशारा वर्षा त्यांनी  राज्यसरकारला दिला . त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  सरकारने फर्मान मागे घेतलं नाही तर काँग्रेसकडून उग्र आंदोलन होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे


आदल्या दिवशीच रावण दहन आटोपून घ्या, असं सरकारचं फर्मान