बातम्या

ग्रा.पंचायत कर्मचारी दोन दिवस संपावर

Gram panchayat employees on strike for two days


By nisha patil - 12/16/2023 5:10:44 PM
Share This News:



 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी संप व आंदोलन असल्याने सोमवार दि.१८ डिसेंबर ते २० डिसेंबर ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.

ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मागण्या प्रलंबित  ठेवल्याने राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सोमवार दि.१८ ते २० डिसेंबर या दोन दिवशी संप व आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत पाणीपुरवठा,स्वच्छता, दाखले व किरकोळ कामाचे विभाग पुर्णपणे बंद करण्यात येणार आहेत.
बंदच्या काळात नागरिकांनी पाणी जपून वापरण्यात यावे असे आवाहन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नामदेव पाटील यांनी तारा न्युज शी बोलताना सांगितले.


ग्रा.पंचायत कर्मचारी दोन दिवस संपावर