बातम्या

ज्ञानेश्वरी शुध्दीकरण दिनानिमित्त इचलकरंजीत भव्य हरिपाठ जागर व दिंडी सोहळा: आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांचा संकल्प

Grand Haripath Jagar and Dindi ceremony at Ichalkaranjit on the occasion of Dnyaneshwari Purification Day


By nisha patil - 9/30/2024 2:52:10 PM
Share This News:



ज्ञानेश्वरी शुध्दीकरण दिनाच्या निमित्ताने संतांचे विचार समाजात पोहचवण्याची व व्यसनमुक्त, सृजनशील विचारांची समाज निर्माण करण्याची संकल्पना आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांची होती. यासाठी श्री काळा मारुती मंदिर आरती भक्त मंडळ व श्री काळा मारुती महिला भक्त मंडळ यांच्या सहकार्याने इचलकरंजीत दहा हजारहून अधिक महिलांच्या उपस्थित हरिपाठ जागर आणि भव्य दिंडी सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमात सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, आमदार प्रकाशआण्णा आवाडे, वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र अध्यक्ष ह.भ.प. श्री विठ्ठल पाटील (काकाजी), इचलकरंजी वारकरी संप्रदायाचे गुरुवर्य सदाशिव उपासे महाराज, माजी नगराध्यक्षा सौ. किशोरीताई आवाडे,  कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे, मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब व सौ. वैशालीताई आवाडे वहिनी, सौ. मोश्मी आवाडे वहिनी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. टाळ व मृदंगाच्या गजरात माऊलींचा जयघोष करत हा सोहळा पार पडला. भक्तिमहोत्सवाच्या वातावरणात विठ्ठल-रखुमाईच्या नामघोषाने संपूर्ण वस्त्रनगरी भक्तीमय झाली. यावेळी श्री काळा मारुती मंदिर आरती भक्त मंडळाचे सदस्य, महिला भक्त मंडळाच्या सदस्या, आवाडे परिवार आणि हजारो वारकरी उपस्थित होते. या दिवशी संतांची शिकवण आणि भक्तीचा संदेश प्रत्येकाच्या मनात ठसा सोडण्यास यशस्वी ठरला.

यावेळी श्री काळा मारुती मंदिर आरती भक्त मंडळाचे सदस्य, श्री काळा मारुती महिला भक्त मंडळ सदस्या, आवाडे परिवार, प्रमुख पदाधिकारी, महिला यांच्यासह हजारोच्या संख्येने वारकरी उपस्थित होते.


ज्ञानेश्वरी शुध्दीकरण दिनानिमित्त इचलकरंजीत भव्य हरिपाठ जागर व दिंडी सोहळा: आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांचा संकल्प