बातम्या
पश्चिम महाराष्ट्रातील भव्य सतेज कृषी प्रदर्शनाची सांगता; चार दिवसात नऊ कोटींची उलाढाल
By neeta - 12/27/2023 3:52:13 PM
Share This News:
कोल्हापूर : तपोवन मैदान येथे आयोजित सतीश कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाची मोठ्या गर्दीत सांगता झाली. चार दिवसात तब्बल नऊ कोटींची उलाढाल झाली. शेतीची विविध साहित्य व यंत्रे मोठ्या प्रमाणात ग्राहकाकडून खरेदी झाली आहेत.
चार दिवसात सात लाख शेतकरी व नागरिकांनी भेट दिली. या चार दिवसात तांदळाची उच्चांकी विक्री झाली असून ,पन्नास लाखांची उलाढाल तांदळा मधून झाली आहे. महिला बचत गटांच्या खाद्यपदार्थ स्टॉलच्या माध्यमातून तीस लाखांची उलाढाल झाली. शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे व अवजारे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आ. सतेज पाटील यांनी चार वर्षापासून या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य सतेज कृषी व पशुपक्षांच्या प्रदर्शनाची सुरुवात केली. यंदाचे हे पाचवं प्रदर्शन होतं.
चार दिवसात कोल्हापुरी सह सांगली सातारा सोलापूर कर्नाटक इचलकरंजी व जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती उपयुक्त साहित्य खरेदी करण्यासाठी प्रचंड खरेदी केली होती. सतेज कृषी प्रदर्शनात देश विदेशातील विविध नामांकित 250 कंपन्यांचा सहभाग होता.
प्रदर्शनात पंढरपुरी म्हैस, जाफराबादी रेडा, कमी उंचीची कुंगूनुर जातीची गाय, तीन वर्षे सहा महिने वय असलेली नऊ लिटर दूध देणारी दानोळी येथील मुऱ्हा जातीची म्हैस, पांढरे बैल, अमेरिकन सिल्क जातीची पायावर केस असलेली कोंबडी, 70 हजार रुपये किमतीचा 97 किलो चा बोकड, बिटेल जातीचा बकरा, माडग्याळ मेंढा, भारतीय वंशाची जाड शिंग असलेली काँगक्रेज जातीची गाय, शाहू नावाचा घोडा प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले
पश्चिम महाराष्ट्रातील भव्य सतेज कृषी प्रदर्शनाची सांगता; चार दिवसात नऊ कोटींची उलाढाल
|