बातम्या

कै .दिलीप जोशी यांच्या स्मरणार्थ सावकर चषक,पन्हाळा आयोजित भव्य टेनिस बॉल स्पर्धा

Grand Tennis Ball Tournament organized by Savkar Chashak


By nisha patil - 9/1/2025 7:57:56 PM
Share This News:



कै .दिलीप जोशी यांच्या स्मरणार्थ सावकर चषक,पन्हाळा आयोजित भव्य टेनिस बॉल स्पर्धा

कोल्हापूर. *पन्हाळा येथे श्री वारणा बँक लि.प्रायोजक शिवछत्रपती पुरस्कार विजेते कै.दिलीप जोशी यांच्या स्मरणार्थ सावकर चषक,पन्हाळा आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे गेले नऊ वर्ष पन्हाळा क्रिकेट क्लब यांच्याकडून आयोजन करण्यात येते.याप्रसंगी अंतिम सामन्यावेळी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थितिती होती 
२ जानेवारी २०२५ रोजी सुरू झालेल्या या स्पर्धेचा ६ जानेवारी २०२५ रोजी अंतिम सामना पार पडला.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नावजलेले १६ संघ सहभागी झाले होते तर फायनल सामना दख्खन पन्हाळा विरुद्ध राजधानी स्पोर्ट्स यांच्यात पार पडला. यात दख्खन पन्हाळा संघ "सावकर चषक" चा मानकरी ठरला.यामध्ये दख्खन पन्हाळा संघ विजयी झाल्याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या...

 

खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी युवकांनी काही वेळ खेळण्याकरिता दिला पाहिजे.ग्रामीण भागांमध्ये क्रिकेट खेळाप्रती प्रचंड आवड दिसते तसेच खेळाच्या माध्यमातून सर्वच खेळाडूंनी करिअरचा मार्ग शोधावा असे आव्हान आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केले...

यावेळी पन्हाळा माजी नगराध्यक्ष विजय पाटील,माजी उपनगराध्यक्ष रविंद्र धडेल,चैतन्य भोसले,जीवन पाटील,पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चैतन्यकुमार माळी,फक्रुद्दीन मुजावर,सचिन पाटील,हर्षद बच्चे,शैलेंद्र लाड,बाळासाहेब भोसले,मोहसीन मुल्ला,सागर गोसावी,रामानंद गोसावी,साहिल पवार,मुनाफ मुजावर,नवाज फरास,अकिब मोकाशी,मोहसिन मुजावर,अक्षय सोरटे,महेश कांबळे,मन्नान फरास,अशपाक गार्दी,केवल कांबळे,संग्राम कांबळे,सचिन गवंडी,विशाल कांबळे,शक्ती सोरटे,मुन्तजर मुजावर तसेच स्पर्धेत भाग घेतलेले सर्व खेळाडू आदी मान्यवर व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते...


कै .दिलीप जोशी यांच्या स्मरणार्थ सावकर चषक,पन्हाळा आयोजित भव्य टेनिस बॉल स्पर्धा
Total Views: 61