बातम्या
कोरोची येथे राहुल आवाडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठी भव्य सभागृह
By nisha patil - 8/2/2025 3:44:53 PM
Share This News:
कोरोची येथे राहुल आवाडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठी भव्य सभागृह
कोरोची येथे भव्य सभागृह आणि वाचनालयाचे लोकार्पण!
कन्या व कुमार विद्या मंदिर, कोरोची येथे माजी गावकामगार पोलीस पाटील स्व. दादा बाळगोंडा पाटील यांच्या स्मरणार्थ स्व. विजया कुबेर (इचलकरंजी) यांच्या निधीतून उभारलेल्या भव्य सभागृह व वाचनालयाचे लोकार्पण आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने हे केंद्र मोलाची भूमिका बजावणार आहे. शिक्षणासोबत सामाजिक भान आणि नेतृत्वगुण विकसित करण्यास मदत होणार असून, समाजाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उन्नतीला बळ मिळणार आहे.
यावेळी सरपंच संतोष भोरे, माजी उपसरपंच अभिनंदन पाटील, शरद कारखान्याचे संचालक डी. बी. पिष्टे, ग्रामविकास अधिकारी अनंत गडवे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्या हीच खरी संपत्ती – हे शिक्षणमंदिर विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवो, अशा शुभेच्छा आमदार राहुल आवाडे यांनी दिल्या!
कोरोची येथे राहुल आवाडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठी भव्य सभागृह
|