बातम्या

शाहूवाडीत मराठा समाजाचा भव्य कँडल मार्च

Grand candle march of Maratha community in Shahuwadi


By nisha patil - 10/31/2023 8:56:49 PM
Share This News:



मनोज जरांगे च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी. शाहूवाडी तालक्यातील सरुड गावात मराठा समाजाने भव्य कँडल मोर्च काढण्यात आला.कँडल मार्च  काढत असताना एक मराठा अशी घोषणाबाजी ही आंदोलकांकडून करण्यात आली.

 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनाचा वणवा पेटला असून, .  मराठा आरक्षणासाठी राज्यात मोठा लढा उभारत चालला आहे.मनोज जरांगे पाटील हे सध्या उपोषण करत आहेत. त्यांच्या या तिसऱ्या टप्प्यातील उपोषणचा आज सातवा  दिवस आहे. तर दुसरीकडे सकल मराठा समाजाच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात आहे आणि मनोज जरांगेच्या उपोषणाला पाठिंबा देत आहे अशातच शाहूवाडी तालक्यातील सरुड गावात सोमवारी मराठा समाजाने भव्य कँडल मोर्चा काढला आहे. मोर्चा काढत असताना एक मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली तसेच मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीची समाजाला चिंता आहे त्यांची महाराष्ट्राला गरज आहे.. त्यांनी आपला जीव जपावा.. प्रसंगी यासाठी आंदोलन मागे घेऊन हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा दौरा करावा अशी विनंती ही जरांगेना करण्यात आली.
  या मोर्चामध्ये महिला, जेष्ठ नागरिकांसह आबालवृद्ध  मोठ्या प्रमाणात सहभागी झालेलेच दिसून आले.


शाहूवाडीत मराठा समाजाचा भव्य कँडल मार्च