बातम्या

महावितरणच्या वर्धापनदिनी वार्षिक ऊर्जा पुरस्काराचे थाटात वितरण कार्यकारी अभियंता सुनिलकुमार माने ‘ऊर्जाशिरोमणी’चे मानकरी

Grand distribution of Annual Energy Award on the anniversary of Mahavitran


By nisha patil - 6/6/2024 9:41:03 PM
Share This News:



कोल्हापूर : महावितरणचा १९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वार्षिक ऊर्जा पुरस्काराचे वितरण मुख्य अभियंता मा.श्री. परेश भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यंदाचा ‘ऊर्जाशिरोमणी’ पुरस्कार कोल्हापूर शहर विभागाचे कार्यकारी अभियंता मा.श्री.सुनिलकुमार माने यांना प्राप्त झाला. वर्धापनदिनी  मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम ‘नटरंग उभा ’, प्रभातफेरी , वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.इचलकरंजी  येथील श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात  वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी अधीक्षक अभियंता मा.श्री.अंकुर कावळे, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) मा.श्री. सुधाकर जाधव,  सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) मा.स्नेहा पार्टे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) मा.श्री.अभिजीत सिकनीस, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मा.श्री. भुपेंद्र वाघमारे, यांच्यासह अधिकारी-कर्मचारी व कुटूंबिय उपस्थित होते. 
 

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता मा.श्री.परेश भागवत यांनी  राज्यात कोल्हापूर परिमंडळ हे सर्वच बाबतीत अग्रस्थानी आहे. ही सातत्यपुर्ण कामगिरी राखण्यात अभियंते, अधिकारी अन् ऊर्जामित्र यांचे  एकसंध परिश्रम व लोकाभिमुख सेवा हे प्रमुख घटक आहेत. यापुढेही  ग्राहकहीतार्थ अशीच कर्तव्य व सेवा बजावण्याचे आवाहन केले. श्री.भागवत यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना  वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 
 

क्रीडा रत्न -जोतिबा अऊळकर (कुस्ती रौपयपदक), अपर्णा महाडीक ( रोलबॉल प्रशिक्षक),ऊर्जारत्न पुरस्कार -प्रविण पंचमुख (कार्यकारी अभियंता, स्थापत्य ), सुरजकुमार जाधव व जयंत चौधरी  (अतिरिक्त कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग), साईप्रकाश आरळी (अतिरिक्त कार्यकारी अभियंता, चाचणी विभाग, कोल्हापूर), रामेश्वर कसबे (उपकार्यकारी अभियंता,राधानगरी), मुकुंद आंबी (उपकार्यकारी अभियंता,फुलेवाडी),  गणेश गलांडे (उपकार्यकारी अभियंता,शिरोळ) उत्तम लांडगे (उपव्यवस्थापक वित्त व लेखा, कोल्हापूर ग्रामीण 2 ), अनुप बेटगिरी (सहाय्यक लेखापाल, वडगाव ), अमृता पाटील (सहाय्यक लेखापाल, इचलकरंजी),रोहितेज पाटील(सहाय्यक लेखापाल, जयसिंगपूर ), अस्मिता जाधव (सहाय्यक लेखापाल, मार्केटयार्ड ), स्वरूप नकाते (सहाय्यक लेखापाल, मलकापूर), सुप्रिया बोधले (सहाय्यक लेखापाल, मध्य विभाग कोल्हापूर ) ऊर्जाभुषण पुरस्कार प्रसाद भालचिम ( उपकार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग), विश्वजित कांबळे व मिलिंद कांबळे (सहाय्यक अभियंता, स्थापत्य विभाग), सुनिल धुळुगडे (सहाय्यक अभियंता, सीपीआर), कपिल जाधव ( सहाय्यक अभियंता, सर्किट हाऊस), प्रकाश पाटील (सहाय्यक अभियंता, मुरगुड), सुमैय्या जमादार (सहाय्यक अभियंता, हुपरी), निहाल नायकवडी (सहाय्यक अभियंता, मध्य विभाग इचलकरंजी), संतोष पाटील (सहाय्यक अभियंता, जवाहरनगर), प्रियंका पाटील (सहाय्यक अभियंता, कुरूंदवाड), विकास कनसे (सहाय्यक अभियंता, तुर्केवाडी), शरद पाटील (सहाय्यक अभियंता, आजरा), सम्राट पाटील (सहाय्यक अभियंता, फिल्टर युनिट),  सलिम मुजावर (कनिष्ठ अभियंता, दानोळी),  अमित कुदळे ( कनिष्ठ अभियंता, हुसुर), ऋषिकेश खांबे( कनिष्ठ अभियंता, केर्ले), स्वप्निल दळवी व कुमार कलकुट्टी (कनिष्ठ अभियंता, स्थापत्य विभाग), उमेश हराळे (उच्चस्तर लिपीक, कोल्हापूर शहर ), अमोल निचिते(निम्नस्तर लिपीक, कोल्हापूर ग्रामीण 2 ), अनिल दुधारे (निम्नस्तर लिपीक, आजरा ), श्रावण रेडेकर (निम्नस्तर लिपीक, चंदगड ), जाफर नदाफ (निम्नस्तर लिपीक, शिरोळ ), रोहीत चपाले (निम्नस्तर लिपीक, परिते), वैभव खोत (निम्नस्तर लिपीक, मुरगुड ), प्रशांत घोलपे (उच्चस्तर लिपीक, राधानगरी )शरद सानप (मुख्य तंत्रज्ञ, जयसिंगपूर विभाग), धनाजी शिंदे (प्रधान तंत्रज्ञ, कुंभोज), अविनाश बोरसे (वरिष्ठ तंत्रज्ञ, कोथळी), इम्रान मुजावर (वरिष्ठ तंत्रज्ञ, इचलकरंजी), लखन कांबळे ( वरिष्ठ तंत्रज्ञ, कबनूर), अमोल साळोखे (वरिष्ठ तंत्रज्ञ, इचलकरंजी), शेखर चव्हाण (वरिष्ठ तंत्रज्ञ, सानेगुरूजी ), अझर शेख (वरिष्ठ तंत्रज्ञ, शेंडा पार्क),मियालाल मुल्लाणी (प्रधान तंत्रज्ञ, वाळवा), सतिश कोळी (वरिष्ठ तंत्रज्ञ, मुरगुड), दिपक पाटील (वरिष्ठ तंत्रज्ञ, सोनगे), संग्राम  दळवी (वरिष्ठ तंत्रज्ञ, कोथळी), युवराज निकम (वरिष्ठ तंत्रज्ञ,परिते), मुस्ताक नगारजी (वरिष्ठ तंत्रज्ञ, सांगरूळ) महेश पाटील (वरिष्ठ तंत्रज्ञ, गडहिंग्लज) बाळकृष्ण सावरटकर (वरिष्ठ तंत्रज्ञ, गडहिंग्लज), संभाजी रवणदे (वरिष्ठ तंत्रज्ञ, उत्तुर 2), प्रविण जाधव (उत्कृष्ट यंत्रचालक, शुगरमिल ), सचिन कांबळे (उत्कृष्ट यंत्रचालक, बोलोली ), विजय बालगुडे (उत्कृष्ट यंत्रचालक, कुरणी ) या कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन ऊर्जा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.  कॅनव्हास चित्रे स्पर्धेतील माधुरी पाटणकर (प्रथम),स्वरदा तिपाण्णावर (तृतीय), बाजीराव पाटील (उत्तेजनार्थ) व सहभागींचा सन्मान करण्यात आला. यावेळी रांगोळी, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे दिली.


महावितरणच्या वर्धापनदिनी वार्षिक ऊर्जा पुरस्काराचे थाटात वितरण कार्यकारी अभियंता सुनिलकुमार माने ‘ऊर्जाशिरोमणी’चे मानकरी