बातम्या

साजणी येथे वैष्णवी पेट्रोलिंक्सचा भव्य उद्घाटन सोहळा..

Grand opening ceremony of Vaishnavi Petrolinks at Sajani


By nisha patil - 12/31/2024 10:39:21 PM
Share This News:



साजणी येथे वैष्णवी पेट्रोलिंक्सचा भव्य उद्घाटन सोहळा..

 मान्यवरांची उपस्थितीने सोहळा मंगलमय

साजणी (ता. हातकणंगले) येथे सरपंच डॉ. राजू मगदूम आणि मगदूम परिवाराने नव्याने सुरू केलेल्या वैष्णवी पेट्रोलिंक्स या पेट्रोल आणि डिझेल विक्री पंपाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या पंपाचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर), माजी आमदार प्रकाश आण्णा आवाडे, आणि इचलकरंजी विधानसभेचे आमदार राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी इचलकरंजी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा किशोरी प्रकाश आवाडे (काकी), हातकणंगले विधानसभेचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू), जयसिंगपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, प्रांताधिकारी समीर शिंगटे, उद्योगपती धनंजय टारे, साजणी गावचे सरपंच शिवाजी पाटील, तसेच आप्पासो उर्फ महावीर मगदूम (सर) आणि चंद्रकांत उर्फ पिंटूदादा मगदूम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या उद्घाटन सोहळ्यात गावकऱ्यांचा मोठा सहभाग होता. नव्या पंपामुळे साजणी व परिसरातील नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलसाठी उत्तम सुविधा मिळणार असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. वैष्णवी पेट्रोलिंक्सच्या यशस्वी वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.


साजणी येथे वैष्णवी पेट्रोलिंक्सचा भव्य उद्घाटन सोहळा..
Total Views: 75