बातम्या

शाहू ग्रुपमार्फत रविवारी भव्य चित्रकला स्पर्धा

Grand painting competition on Sunday by Shahu Group


By nisha patil - 7/16/2024 9:16:21 PM
Share This News:



शाहू ग्रुपमार्फत रविवारी भव्य चित्रकला स्पर्धा

स्व विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त आयोजन


छत्रपती शाहू ग्रुपचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७६व्या जयंतीनिमित्त रविवारी(ता.२१)भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.सलग तेविसाव्या वर्षी ही स्पर्धा होत आहे. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि. कागल प्रणित श्री छत्रपती शाहू कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कागल यांनी स्पर्धेचे आयोजन केले आहे.

   कागल थे श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व जुनिअर कॉलेज, मुरगुड येथे मुरगुड विद्यालय, सेनापती कापशी येथे न्यायमूर्ती रानडे विद्यालय तर कणेरी (ता.करवीर) करवीर येथील श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज अशा चार केंद्रांवर एकाच वेळी ही स्पर्धा होईल.
 

   स्व.घाटगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तेवीस वर्षांपूर्वी कागल केंद्रावर या चित्रकला स्पर्धेला सुरुवात झाली.त्यांच्या निधनानंतर जयंतीनिमित्त शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही चित्रकला स्पर्धा घेण्यात येत आहे.मुलांमध्ये असणाऱ्या सुप्त  गुणांना वाव मिळावा. या उद्देशाने सुरू केलेल्या या चित्रकला स्पर्धेस वाढता प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे आता ही चित्रकला स्पर्धा कागल, मुरगुड, कापशी व कणेरी अशा चार केंद्रांवर घेतली जाते. सहा गटांमध्ये ही स्पर्धा होईल. त्यामध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचे चार गट, मूकबधिर मुलांसाठी स्वतंत्र व मतिमंद मुलांसाठी स्वतंत्र गटांमध्ये ही स्पर्धा होईल.स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट तसेच पहिल्या तीन क्रमांकासह उत्तेजनार्थ विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित केले जाईल.
रविवारी सकाळी दहा वाजता पहिल्या टप्प्यात सहावी ते सातवी, आठवी ते दहावी, मूकबधिर व मतिमंद गटातील स्पर्धा होतील. या गटासाठी दोन तासांचा वेळ राहील. तर दुसऱ्या सत्रात पहिली ते तिसरी व चौथी ते पाचवी या गटातील स्पर्धा होतील. या गटासाठी दीड तासांचा वेळ राहील. पहिली ते तिसरी या गटातील स्पर्धकांना रंगीत खडू किंवा स्केच पेन वापरता येईला. पुढील गटातील स्पर्धकांनी वॉटर कलर वापरण्याचे आहेत. सर्व स्पर्धकांना संयोजकामार्फत पुरवलेल्या ड्रॉइंग पेपरवर चित्र काढणे बंधनकारक राहणार आहे.मूकबधिर विद्यार्थी गटात रंगीत खडूसह स्केच पेन किंवा वॉटर कलर वापरता येतील. चित्रकला स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे शाळेमार्फत मुख्याध्यापकांच्या सहीने शुक्रवार ता(१९) जुलै पर्यंत नजीकच्या केंद्रावर नोंदविणेची आहेत.ही स्पर्धा कागल तालुका व कारखाना कार्यक्षेत्र मर्यादित स्पर्धकांसाठी राहील. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


शाहू ग्रुपमार्फत रविवारी भव्य चित्रकला स्पर्धा