बातम्या

ग्रंथ हेच आपले गुरु -माजी प्राचार्य अर्थायनकार डॉ.जे.के.पवार

Granth is our Guru  ExPrincipal Economist Dr J K Pawar


By nisha patil - 5/15/2024 5:59:09 PM
Share This News:



पन्हाळा : प्रतिनिधी ग्रंथ हे आपले गुरू आहेत त्यामुळे शिक्षकांनी ग्रंथ हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे समजून त्यांच्याशी मैत्री करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी प्राचार्य अर्थायनकार डॉ.जे.के.पवार यांनी केले.

श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथे कोरोना काळ या ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी डॉ.जे.के.पवार बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था सचिव शिवाजीराव पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ.बी.एन.रावण, ॲक्टिव्हिटी प्रमुख डॉ.एस.एस. कुरलीकर होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.दत्तात्रय नाईक यांनी केले तर आभार डॉ.यु.एन.लाड यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

 


ग्रंथ हेच आपले गुरु -माजी प्राचार्य अर्थायनकार डॉ.जे.के.पवार