बातम्या

कोल्हापूरात लोक अदालतीस भरघोस प्रतिसाद

Great response to Lok Adalat in Kolhapur


By nisha patil - 11/12/2023 7:42:09 PM
Share This News:



कोल्हापूरात लोक अदालतीस भरघोस प्रतिसाद 

पक्षकारांचे वाद मिटल्याने आपल्याला समाधान - न्या. कविता आग्रवाल

 देशभरात राष्ट्रीय लोकअदालतीचं आयोजन
 

 न्यायासाठी  तिष्टत असलेल्यांना  लोक अदालत सुवर्ण संधी ठरली.


कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या वतीने शनिवारी  लोक अदालतीचे आयोजन केले होते, याचे उदघाटन न्यायाधीश कविता आग्रवाल यांच्यासह महाराष्ट्र गोवा बार आसोशिअशन चे माजी अध्यक्ष विवेक घाटगे,कोल्हापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष विजयसिंह पाटील आदींनी झाडाला पाणी घालून केले.

या लोकअदालतीमध्ये   जिल्हयातील न्यायालयात प्रलंबित असलेली  दिवाणी, फौजदारी कौटुंबीक प्रकरणं  तडजोडीसाठी   ठेवण्यात आली होती .  याचबरोबर कुठल्याही न्यायालयात प्रलंबित नसलेली म्हणजेच दाखलपूर्व अशी बँकांकडील थकीत वसुली, ग्रामपंचायत महापालिकेकडील पाणीपट्टी, घरफाळा वसुली, फायनान्स-मोबाईल कंपन्यांची थकीत रकमांची वसुली प्रकरणी या अदालतीत ठेवण्यात आली होती. 

तालुका न्यायालय आणि जिल्हा न्यायालयात एकूण ३७ पॅनेल लोकअदालतीकरता निश्‍चित करण्यात आली होती. या लोक न्यायालयात प्रलंबित १ हजार ९४१ प्रकरणं ,दाखलपूर्व १ लाख ४४ हजार ४३५ अशी १ लाख ५५ हजार ३७६ प्रकरणं ठेवण्यात आली होती. त्यापैकी मोटर अपघात नुकसान भरपाईबाबतची ६० प्रकरणं, कौटुंबीक न्यायालयातील पती-पत्नीच्या वादातील ३७ खटले तडजोडीनं मिटवण्यात आले.
 

स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत ३३९ प्रकरणं निकाली निघाली. कामगार न्यायालयातील ११ खटले, ७७३ दिवाणी प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली. ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेकडील घरफाळा, पाणीपट्टी, बँक वसुली आणि इतर अशी १ लाख ३ हजार ३२२ प्रकरणं निकाली काढण्यात आली. हा आजवरच्या इतिहासात विक्रम ठरला

. लोक न्यायालयाला वकिल आणि पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सर्वच निकाली खटल्यातून ६४ कोटी ११ लाख ५२ हजार २४९ एवढया रकमेची वसुली झाली. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश एस.आर.साळुंखे, श्रीमती व्ही.पी.गायकवाड, दिवाणी न्यायाधीश शैलश बाफना तसंच महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे, बारचे उपाध्यक्ष विजय पाटील, तेजगोंडा पाटील यांच्यासह विविध न्यायाधीश, कर्मचारी, विधीसेवा प्राधिकरण आणि लॉ कॉलेजचे विद्यार्थी यांचं सहकार्य लाभलं.


कोल्हापूरात लोक अदालतीस भरघोस प्रतिसाद