बातम्या

गार्डन्स क्लब कोल्हापूर तर्फे ग्रीन शॉपी चे आयोजन...

Green shop organized by Gardens Club Kolhapur


By nisha patil - 3/16/2024 7:55:31 PM
Share This News:



गार्डन्स क्लब कोल्हापूर तर्फे चांदवाणी हॉल येथे ग्रीन शॉपी चे आयोजन करण्यात आलेले आहे.त्याचे उदघाटन प्रसिद्ध उद्योगपती श्री नरेश चांदवाणी व मिसेस दिव्या चांदवाणी यांच्या हस्ते झाले. जवळ जवळ 35 स्टॉल्स आणि शंभरावर उत्पादने इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे हि सर्व उत्पादने पर्यावरणपूरक आहेत आणि जास्तीत जास्त क्लब मेंबर्स नि बनवलेली आहेत. इथे रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंगही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

शनिवार आणि रविवार असे दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात आज दुपारी श्री कृपेश हिरेमठ यांनी कागदापासून फुले बनवण्याचे प्रशिक्षण दिले. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल क्लब च्या अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी यांनी आभार मानले आहेत आणि उद्या होणाऱ्या मोफत नैसर्गिक रंगाच्या कार्यशाळेस हि नागरिकांनी जरूर सहभागी व्हावे असं आवाहन त्यांनी केले आहे. या प्रसंगी क्लब च्या सचिव सुप्रिया भस्मे, कोषाध्यक्ष प्राजक्ता चरणे , समन्वयक शैला निकम व सुमित्रा ढवळे उपस्थित होत्या


गार्डन्स क्लब कोल्हापूर तर्फे ग्रीन शॉपी चे आयोजन...