बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे पुण्यतिथी निमित्त अभिवादन
By nisha patil - 10/23/2024 3:41:52 PM
Share This News:
संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांनी कुटूंब, संस्था, गुरुदेव कार्यकर्ते यांच्याशी स्नेहभावाने व आईच्या मायेने प्रेम केले. संस्थेच्या गुरुदेव कार्यकर्त्याला आपल्या परिवारातील समजून आणि त्यावर लेकरासारखी माया केली. सामान्यपण जपत असामान्य कर्तृत्व केले. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे
यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करताना खंबीरपणे साथ दिली. संसार करताना गरीबी, अडचणी आणि आव्हाने यांच्याशी दोन हात करीत संस्थेच्या प्रसार आणि विस्तारासाठी सारे आयुष्य वेचले. असे मत प्रा डॉ. सौ. संपदा टिकपुर्ले यांनी मांडले. संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या यांच्या हस्ते करणेत आले.
स्वागत स्टाफ सेक्रेटरी प्रा. ए.बी.वसेकर यांनी केले. आभार स्टाफ सेक्रेटरी डॉ.बी.टी. दांगट यांनी मानले. यावेळी ज्युनिअर, सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी रजिस्ट्रार श्री. आर.बी.जोग, उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे पुण्यतिथी निमित्त अभिवादन
|