बातम्या
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छ.संभाजी राजेंना अभिवादन
By nisha patil - 1/16/2025 3:11:33 PM
Share This News:
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छ.संभाजी राजेंना अभिवादन
छत्रपती संभाजी महाराज यांचा आज 344 वा राज्याभिषेक दिन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने साजरा करण्यात आला. शिवसेना उपनेते तथा जिल्हाप्रमुख संजय पवार व सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या मार्गदर्शनाखाली रुईकर कॉलनी येथे असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीस पुष्पहार अर्पण करून ध्येयमंत्र घेण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.जय भवानी, जय शिवाजी या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या कार्यक्रमाप्रसंगी हर्षल सुर्वे, दिनेश साळोखे,पप्पू कोंडेकर, सुनील मोदी, संतोष रेडेकर, शशिकांत बिडकर ,धनाजी दळवी, स्मिता सावंत, आदी उपस्थित होते
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छ.संभाजी राजेंना अभिवादन
|