बातम्या
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांना शहाजी महाविद्यालयात पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
By nisha patil - 2/1/2024 12:54:40 PM
Share This News:
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांना शहाजी महाविद्यालयात पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
कोल्हापूर: श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आज कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या 80 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे संशोधन केंद्राच्या समन्वयक प्रोफेसर डॉ. सौ. सरोज पाटील यांनी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
डॉ. सरोज पाटील यांनी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन आणि कार्याची सखोल माहिती दिली. त्या म्हणाल्या, विसाव्या शतकात अस्पृश्यद्धारासह विविध सामाजिक कार्य विठ्ठल रामजी शिंदे यांनी केले होते. अस्पृशोद्धाराचे त्यांचे हे सामाजिक कार्य आजही प्रेरणादायी असे आहे.
प्राचार्य डॉ.आर.के. शानेदिवाण म्हणाले, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांचे संशोधन केंद्र या महाविद्यालयात असून त्यांची मोठी साहित्य संपदा या ठिकाणी आहे. विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधकांनी त्याचा अधिकाधिक उपयोग करून कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य तरुणांच्या पर्यंत, विद्यार्थ्यांच्या पर्यंत न्यावे असे आवाहन त्यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी केले.इतिहास विभाग प्रमुख डॉ.सुरेश शिखरे यांनी आभार मानले. डॉ. आर.डी.मांडणीकर, सर्व प्राध्यापक प्रशासकीय सहकारी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवन कार्यावरील ग्रंथसंपदेचे यावेळी शिवाजी ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शन झाले. उपग्रंथपाल यु यु साळुंखे, सौ. मंजिरी भोसले, सौ. अर्पणा गावडे, सुहास टिपुगडे, बाळासाहेब इंगवले, विजय लाड दीपक गुरव, अतुल कांबळे यांनी संयोजन केले.
या उपक्रमात संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे प्रोत्साहन मिळाले
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांना शहाजी महाविद्यालयात पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
|