बातम्या
ममता दिनी शिवसेनेच्यावतीने "माँसाहेब स्व.मीनाताई ठाकरे" यांना अभिवादन
By nisha patil - 6/1/2025 10:29:02 PM
Share This News:
ममता दिनी शिवसेनेच्यावतीने "माँसाहेब स्व.मीनाताई ठाकरे" यांना अभिवादन
कोल्हापूर दि.०६ : तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ.मीनाताई ठाकरे यांचा ९४ वा जन्मदिन म्हणजेच ममता दिनी कोल्हापूर शिवसेना, महिला आघाडी यांच्यावतीने माँसाहेबाना अभिवादन करण्यात आले. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात माँसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी " माँसाहेब अमर रहे" अशा घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात आल्या.
यावेळी बोलताना डॉ.नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे स्वर्गीय मीनाताई ठाकरे या शिवसैनिकांचे श्रधास्थान आहेत. त्या प्रत्येक शिवसैनिकासाठी आजही " माँसाहेब" आहेत. त्यांनी शिवसैनिकांवर पुत्रवत प्रेम केले. केवळ माँसाहेबांमुळेच शिवसेना हा पक्ष, संघटना न राहता एक अतिविशाल कुटुंब बनले. त्यांनी दिलेली शिकवण आजही प्रत्येक शिवसैनिकासह, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात कोरली गेली आहे. त्यांची आठवण पावलोपावली येते. त्याच शिकवणीनुसार महिला आघाडी समाजकार्यासह प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे. यापुढेही माँसाहेब शिकवणीनुसार कार्यरत राहू, असे सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, समन्वयक पूजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, पूजा कामते, नम्रता भोसले, तेजस्विनी घाटगे, पूजा पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, दीपक चव्हाण, दुर्गेश लिंग्रस, उदय भोसले, कमलाकर जगदाळे, सुनील जाधव, रणजीत मंडलिक, धनाजी कारंडे, सुरेश माने, निलेश हंकारे, प्रभू गायकवाड, कपिल केसरकर, पियुष चव्हाण, कपिल सरनाईक आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ममता दिनी शिवसेनेच्यावतीने "माँसाहेब स्व.मीनाताई ठाकरे" यांना अभिवादन
|