बातम्या
शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांना अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त अभिवादन
By nisha patil - 7/28/2023 5:41:31 PM
Share This News:
कागल, प्रतिनिधी. येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७५ व्या जयंती निमित्त शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर अभिवादन केले. कारखाना प्रांगणातील त्यांच्या पुतळ्यास कारखान्याच्या अध्यक्षा व शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कारखाना प्रांगणातील राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण केला.
या निमित्ताने वैद्यकीय अधिकारी डॉ सुप्रिया लोखंडे डाॕ. ध्वनी छेडा समाजसेवा अधीक्षक जयवंत कदम
यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सव्वाशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सालाबादप्रमाणे कारखाना साईट येथे नागोबा देवालय परिसरात वृक्षारोपण केले.
दरम्यान आज दिवसभर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिक व शेतकरी यांनी कारखाना कार्यस्थळी स्व.घाटगे यांना अभिवादन करण्यासाठी रीघ लावली होती.
दरम्यान मंडलिक साखर कारखान्याचे संचालक वीरेंद्र मंडलिक गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनीही कारखाना कार्यस्थळावर स्व.घाटगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, सर्व संचालक ,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण भाजपचे कोल्हापूर महानगरचे अध्यक्ष विजय जाधव,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. आनंद गुरव आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी ,सभासद,शेतकरी,कार्यकर्ते, कर्मचारी उपस्थित होते.
शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांना अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त अभिवादन
|