बातम्या

रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांना पन्हाळगडावर अभिवादन

Greetings to Ramchandrapant Amatya Bavdekar at Panhalgad


By nisha patil - 2/15/2025 2:53:25 PM
Share This News:



रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांना पन्हाळगडावर अभिवादन

पन्हाळा : 'हुकूमतपत पनाह' रामचंद्रपंत अमात्य बावडेकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात अमात्यपद भूषविलेल्या हुकूमतपत पनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांना ३०९ व्या स्मृतिदिनी पन्हाळगडावरील त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले. यानिमित्त ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व लेखक डॉ. उदय कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत समाधीपूजन करण्यात आले.

नील पंडित बावडेकर यांनी स्वागत केले. पन्हाळ्यावरील समाधीस्थळी असलेल्या आज्ञापत्रातील माहिती पाहून ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. कुलकर्णी यांनी समाधीस्थळाबाबत गौरवोद्गार काढले. ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. अमर

आडके म्हणाले, "हुकूमतपत पनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सर्वात तरुण अमात्य होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, करवीरकर छत्रपती शिवाजी महाराज पाहिले व करवीरकर छत्रपती संभाजी महाराज पाहिले, अशा पाच छत्रपतींच्या कालखंडात तब्बल चाळीस वर्षे सेवा बजावली. त्यांनी शिवाजी महाराजांच्या राजनीतीवर आधारित असलेल्या आज्ञापत्र या ग्रंथाचे लेखन केले." यावेळी माजी नगराध्यक्षा रूपाली धडेल, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, दिनकर भोपळे, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, हेमंत साळोखे, हनीफ नगारंजी उपस्थित होते.


रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांना पन्हाळगडावर अभिवादन
Total Views: 34