बातम्या
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा
By nisha patil - 2/16/2024 1:03:39 PM
Share This News:
वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7.20 वाजता छत्रपती शाहू टर्मिनस, कोल्हापूर येथे आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता के.डी.सी.सी. बँक कार्यकारी समिती बैठक व अधिकाऱ्यांसोबत चर्चा. (स्थळ : कोल्हापूर) सायं. 6 वाजता कागल येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा. (स्थळ : कागल) रात्री 8 वाजता विरेंद्र (बंटी) सावंत यांच्या विवाहाचा 25 वा वाढदिवस कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : धैर्यशील हॉल, कोल्हापूर) सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान कागल)
शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7 ते 10 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) 10.30 वाजता छत्रपती शाहू महाराज स्वयंरोजगार संस्था, लिंगनूर का. रणजित सांगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे व पत्रव्यवहाराचे प्रदर्शन. (स्थळ : श्री राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर) दुपारी 12 ते 4 वाजता राखीव. दुपारी 4.10 वाजता सौ. दिपाली आवळे, रा. करनूर यांच्याशी चर्चा. (स्थळ : कागल विश्रामगृह, कागल) 4.20 वाजता का. सांगाव, ता. कागल ग्रामपंचायत सदस्य यांच्यासमवेत चर्चा. (स्थळ : कागल विश्रामगृह, कागल) 5.30 वाजता स्वप्नील शहा, रा. कागल यांच्या शहा स्नॅक सेंटरचा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : कोल्हापूर वेस, कागल) सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान कागल)
रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7 ते 10 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) यानंतर होमिओपॅथिक मेडीकल कॉलेज माजी विद्यार्थी संघटना ताराराणी चौक, कोल्हापूर होमसॅकनच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : ताराराणी चौक, कोल्हापूर) 11 वाजता बांधकाम विभाग, पंचायत समिती आजरा येथे मृत्युंजयकार शिवाजी सावंत स्मृती दालन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : पंचायत समिती आजरा) 12 ते 4 राखीव. 4 वाजता कोल्हापूर जिल्हा कृषी विभागातील अधिकारी यांच्याशी चर्चा. सायं. 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्वराज्य सप्ताह मधील गुणवंतांचा सत्कार. (स्थळ : नगरपरिषद पन्हाळा) 7 वाजता प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या कन्येच्या साखरपुडा कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : कोंडेकर फार्म्स लॉन, कात्यायनी मंदिर शेजारी, कळंबा, कोल्हापूर) सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान कागल)
सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7 ते 9 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) 9.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कागल येथील निपाणी वेस येथे शिवज्योतीचे आगमन. (स्थळ : निपाणी वेस, कागल) 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक प्रारंभ. (स्थळ : निपाणी वेस, कागल) 12.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजन्मकाळ सोहळा. (स्थळ : एसटी स्टँड, कागल) 1 ते 4 राखीव. 4 वाजता जिजाऊ फौंडेशन संचलित छत्रपती युवा ग्रुप उत्तुर संयुक्त शिवजयंती सोहळा 2024 भव्य दिव्य मिरवणूक सोहळा. (स्थळ : उत्तूर, ता. आजरा) सायं. 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजयंती सोहळा 2024 गडहिंग्लज येथे भव्य दिव्य मिरवणूक सोहळा. (स्थळ : गडहिंग्लज) सायं. 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक सोहळा. (स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, एसटी स्टँड, कागल) रात्री 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना होणार
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा
|