बातम्या

कोल्हापूर उत्कृष्ट व आदर्श करणार : पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ

Guardian Minister N Hasan Mushrif


By nisha patil - 1/16/2024 8:10:46 PM
Share This News:



कोल्हापूर उत्कृष्ट व आदर्श करणार : पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ 

शहरातील १०० कोटींच्या रस्ते विकास प्रकल्पाचा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ 

कोल्हापूर ता.१६ :- कोल्हापूर शहरात महापुरामुळे खराब झालेल्या रस्त्यांमधील १००.३३ कोटींच्या १६ रस्त्यांचा शुभारंभ पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मिरजकर तिकटी येथे करण्यात आला. यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थान महाभियानाअंतर्गत शासनाकडून १००.३३ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये १६.६८ कि.मी चे १६ मुख्य रस्ते करण्यात येणार आहेत. पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना शहरात आता १००.३३ कोटी रुपयांच्या रस्त्यांचे काम सुरु होत आहे, लवकरच नव्याने मागणी केलेल्या ९० कोटींच्या ८९ रस्त्यांच्या कामांसाठीही निधी येईल असे सांगितले. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करु. शहरात महापुरामुळे रस्त्यांची आवस्था वाईट झाली होती. त्यामुळे नागरीकांना या रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत होता. या नवीन कामामुळे नागरीकांना होणारा त्रास आता संपेल. अधिकाऱ्यांनी ठेकेदारांकडून चांगली दर्जेदार कामे करुन घ्यावीत असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सर्व लोकप्रतिनिंधी एकत्र मिळून शहराच्या विकासासाठी लागणारा निधी आणण्यासाठी प्रयत्न करु. थेट पाईपलाइनचे स्वप्न पूर्ण झाले. त्यातील तांत्रिक अडचणी दूर करून येत्या काळात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित भव्य लोकार्पण कार्यक्रम घेणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. पुढील जिल्हा नियोजनच्या आराखड्यातून अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासाठी १०० कोटी मिळतील. यातून अंबाबाई मंदिर परिसराचा विकास होईल. श्री अंबाबाई मंदिर, जोतिबा आणि नृसिंहवाडी येथील नियोजित कामे पूर्ण झाल्यास जिल्ह्यात १० पट भाविक व पर्यटक वाढतील. देशातील नंबर एकचे कोल्हापूर करुन ते उत्कृष्ट आणि आदर्शवत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार श्रीमती जयश्री जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, शहर अभियंता हर्षजीत घाडगे, प्रा.जयंत पाटील, विजय जाधव, आदिल फरास, राजेश लाटकर, सत्यजित कदम, सुजित चव्हाण, महेश जाधव, राहुल चिकोडे, राहूल चव्हाण, मुरलीधर जाधव, विलास वास्कर,  यांच्यासह माजी नगरसेवक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. 
    उद्घाटन केलेल्या रस्त्यांमध्ये दसरा चौक ते बिंदु चौक ते खासबाग ते मिरजकर तिकटी ते नंगीवाली चौक इंदिर सागर हॉटेल चौक, प्रभाग क्र.69 समाधान हॉटेल ते आय कॉर्नर.आय.टी., सुभाष रोड (60 वाईड डी.पी.) ते भोसले हॉस्पिटल, लक्षतिर्थ चौक ते निगवेकर गोडाऊन ते अण्णासो शिंदे शाळा, राजारामपुरी माऊली चौक ते हुतात्मा चौक ते गोखले कॉलेज चौक कन्हैया सर्विसिंग सेंटर ते विश्वजित हॉटेल, निर्मिती कॉर्नर ते कळंबा जेल, राधानगरी रोड ते गंगाई लॉन, शाहु सेना चौक ते झुम एसटीपी प्रकल्प, अनुग्रह हॉटेल ते लट्ठे पुतळा ते संघवी बंगला, डॉ. एम. विश्वेश्वर हॉल ते चंदवाणी हॉल, हॉटेल रसिका ते जाधववाडी रिंगरोड, अॅपल हॉस्पिटल ते वसंतनगर ते झेडपी कंपाऊंड, गोल्डीज जिम ते सदर बजार चौक, लक्ष्मीपुरी वाणिज्य वसाहत जैन मंदिर, पान लाईन ते धान्य बझार, वृषाली आयलंड ते पर्ल हॉटेल ते केएमसी फिजिओथेरपी हॉस्पिटल नेक्स्ट क्रॉसींग रोड, प्रभाग क्रमांक 78 निर्माण चौक ते जरग नगर शेवटचा बसस्टॉप, प्रभाग क्रमांक 47 खरी कॉर्नर चौक गांधी मैदान चौक ते उभा मारुती चौक या १६ रस्त्यांचा समावेश आहे. 
    
    राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज कोल्हापूर शहरासाठी आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले. 2019 च्या पूरामध्ये बरेचशे रस्ते खराब झाले होते. यावेळी महापालिकेने 265 कोटीचा आराखडा शासनास सादर केला होता. तत्कालीन नगरविकास मंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे वेळोवेळी पाठपुरावा करून १०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महापालिकेत मी बैठक घेऊन मंजूर रस्ते पुन्हा खोदून खराब होऊ नयेत म्हणून या रस्त्यावरील यूटिलिटी शिफ्टिंगची कामे पहिल्यांदा करुन घेणेबाबत प्रशासनाला सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे आता शहरातील सर्व यूटिलिटी शिफ्टिंगची कामे पूर्ण झाली आहेत. नवीन रस्ता तयार झाल्यावर तो खोदण्याची गरज भासणार नाही. शहरात टिकतील असे चांगले दर्जेदार रस्ते तयार होतील. 
    आमदार जयश्री जाधव यांनी बोलताना ठेकेदार यांनी चांगल्या दर्जाचे कामे करावीत. नागरीकांनीही कामाच्या दर्जावर लक्ष ठेवावे असे सांगितले. यानंतर माजी नगसेवक सत्यजीत कदम यांनी मनोगत व्यक्त केले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर अभियंता हर्षजीत घाडगे यांनी केले. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी सर्वांचे आभार मानले.
0000


कोल्हापूर उत्कृष्ट व आदर्श करणार : पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ