बातम्या
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली आम.विनय कोरेंची भेट
By nisha patil - 1/31/2025 7:52:40 PM
Share This News:
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली आम.विनय कोरेंची भेट
विविध राजकीय आणि विकासात्मक विषयावर चर्चा
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांची सौजन्य भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध राजकीय आणि विकासात्मक विषयांवर चर्चा झाली.
यावेळी, महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमदार डॉ. विनय कोरे यांनी प्रकाश आबिटकर यांचा सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली आम.विनय कोरेंची भेट
|