बातम्या
मधुमेहावर रामबाण उपाय आहेत पेरुची पाने, असे करावे सेवन
By nisha patil - 9/1/2024 7:44:16 AM
Share This News:
हिवाळा सुरु झाला की अनेक आजारांना सामोरे जावे लागते. सर्दी खोकला तर सामान्य झाला आहे. पण हिवाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांना देखील समस्यांचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात मधुमेह झालेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत होते त्यामुळे ते आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.
हिवाळ्यात रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे औषधे घेतल्यानंतरही इन्सुलिनची पातळी नियंत्रित करणे कठीण होऊन जाते. पण तुम्ही काही घऱगुती उपायांनी यावर नियंत्रण ठेवू शकता.
आज आम्ही तुम्हाला एक रामबाण उपाय सांगणार आहोत. जो इंसुलिन उत्पादनात तुम्हाला मदत करू शकतो. आयुर्वेदानुसार पेरूच्या पानांचा चहा रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी रामबाण उपाय असल्याचा दावा केला जातो. ही पाने साखर कशी नियंत्रित करतात आणि त्यापासून चहा कसा बनवायचा ते जाणून घेऊया.
पेरूच्या पानांचा चहा मधुमेहाच्या रुग्णांवर कसा प्रभावी आहे
पेरू हे फळ हिवाळ्यात बाजारात उपलब्ध असते. पेरू हे अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असे फळ आहे. पण त्याची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. पेरूच्या झाडाची पाने औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. आयुर्वेदात त्याचे अनेक उपाय सांगितले आहेत.
पेरूच्या पानांचा चहा रक्तातील साखर नियंत्रित करतो. या चहातून नैसर्गिकरित्या इन्सुलिन तयार होते. पेरूच्या पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स, टॅनिन आणि पॉलिफेनॉल सारखी संयुगे असतात. तसेच यात मधुमेहविरोधी गुणधर्म देखील असतात. त्यामुळे मधुमेह झालेले रुग्ण या चहाचे सेवन करु शकतात.
दातदुखी दुखीवर देखील पेरुचे पाने रामबाण उपाय म्हणून काम करतात. पेरूची पाने आणि दोन लवंगा घालून पावडर तयार करुन घ्या. त्यानंतर एक ग्लास पाण्यात टाकून ते चांगले उकळून घ्या. थंड झाल्यानंतर त्याचे सेवन करा. यामुळे दातदुखीपासून आराम मिळतो. पेरूची पाने चघळल्यानेही दातदुखीपासून आराम मिळू शकतो.
पेरुच्या झाडाची पाने खोकल्यावर रामबाण उपाय आहेत. पेरूच्या पानांचा चहा पिल्याने खोकला निघून जातो. ताजी पेरूची पाने सुकवून ठेचून घ्या. या पानांमध्ये तुळस, काळी मिरी, लवंग आणि आले मिसळून त्याचे सेवन करा, खोकल्यापासून आराम मिळेल.
मधुमेहावर रामबाण उपाय आहेत पेरुची पाने, असे करावे सेवन
|