बातम्या

जनरेट्यामुळे गेस्ट हाऊस थांबले अन ग्राउंड अबाधित राहिले- माझी उपसरपंच संजय यादव

Guest house stopped due to generator and ground remained intact  Sanjay Yadav


By nisha patil - 11/3/2024 12:19:26 PM
Share This News:



पन्हाळा - प्रतिनिधी पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथील वनहद्दीत  २५ वर्षापूर्वी लोकवर्गणीतून तयार केलेल्या भव्य क्रीडांगणावर अचानक वन विभागाने कार्यालय उभारण्याचे नियोजन केल्याने क्रीडांगणाचे अस्तित्वच धोक्यात आले होते. त्यामुळे क्रीडाप्रेमी, ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी त्याला विरोध दर्शविला. ग्रामपंचायत,  ग्रामस्थांनी पुढाकार घेत गेस्ट हाऊससाठी पर्यायी जागा स्वखर्चाने अतिक्रमणमुक्त करून दिल्याने क्रीडांगणावरील गेस्ट हाऊसचे नियोजन वनविभागाने रद्द केले. वनरक्षक बाजीराव देसाईंसह वन अधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. मात्र आता वाघवे क्रीडांगण तात्पुरते वाचले असून या पुढेही केंव्हाही वन विभागाकडून क्रीडांगणावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे कायमस्वरूपी क्रीडांगणासाठी लोकप्रतिनिधी, सर्व स्तरातून प्रयत्न करणे गरजेचे आहे.  वाघवेला पूर्वी बारा वाड्या जोडल्या होत्या, सध्या गुडेसह वाघवेला आठ वाड्या जोडल्या आहेत. गावासह वाड्यांमध्ये क्रीडाप्रेमींची संख्या जास्त असल्याने मैदानाची गरज होती. त्यामुळे गावाशेजारील वनहद्दीत सुमारे १९९९ मध्ये ग्रामस्थांनी पुढाकार घेत लोकवर्गणीतून क्रीडांगण तयार केले. येथे स्पर्धा भरवण्यास सुरुवात झाली.  वन विभागाच्या सहकार्याबद्दल क्रीडाप्रेमींतून समाधान वाघवेशेजारी असलेल्या वनहद्दीत कोणीही अतिक्रमण करु नये.

शेणी लावण्यासह गवत, वैरणीच्या गंज्या रचू नयेत. तसेच वनहद्दीत कोणत्याही प्रकारे कचरा, इतर वस्तू टाकू नयेत. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे बाजीराव देसाई यांनी सांगितले. शालेय स्पर्धाही होऊ लागल्या. त्यामुळे परिसरातील खेळाडूंची नाळ क्रीडांगणाशी जोडली गेली. क्रीडांगण नावारुपाला आले. मात्र वन विभागाने याच क्रीडांगणावर गेस्ट हाऊससाठी खड्डे काढल्याने क्रीडाप्रेमी हवालदिल झाले. ग्रामस्थांनी गेस्ट हाऊसला विरोध केला. दरम्यान वनाधिकारी आणि ग्रामस्थांत झालेल्या चर्चेत गेस्ट हाऊससाठी पर्यायी जागेचा तोडगा निघाला. त्यानंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेत
 

वनाधिकाऱ्यांच्या सहकार्याने स्वखर्चातून जेसीबीच्या सहाय्याने गावाशेजारी वनहद्दीतील पर्यायी जागा अतिक्रमणमुक्त करून देऊन क्रीडांगण वाचवले. यावेळी वनरक्षक बाजीराव देसाई, अधिकारी, पोलीस पाटील गणेश पोवार, माजी उपसरपंच संजय यादव, युवराज पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.


जनरेट्यामुळे गेस्ट हाऊस थांबले अन ग्राउंड अबाधित राहिले- माझी उपसरपंच संजय यादव