विशेष बातम्या

गुफी पेंटल यांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

Guffy Pental's battle with death was unsuccessful


By nisha patil - 5/6/2023 6:32:16 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'महाभारत' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत 'शकुनी मामा'ची भूमिका साकारणारे गुफी पेंटल  यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
गुफी पेंटल यांच्या निधनाबद्दल माहिती देताना त्यांचा पुतण्या हितेन पेंटलने  सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्याने गुफी पेंटल यांचे निधन झाले आहे. गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. त्यामुळे ते लवकरच घरी परत येतील, अशी कुटुंबियांना आशा होती. काही वर्षांपासून ते हृदय आणि किडनी संबंधित आजाराने ग्रस्त होते". 
 गुफी पेंटल यांचे आज सकाळी  9.30 च्या सुमारास निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गुफी पेंटल यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत होते. पण अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आता त्यांच्या निधनानंतर सेलिब्रिटींसह चाहते शोक व्यक्त करत आहेत. 
गुफी पेंटल यांनी वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांनी मालिकांसह सिनेमांतदेखील काम केलं आहे. पण बी.आर चोप्रा यांच्या 'महाभारत' या मालिकेच्या माध्यमातून ते घराघरांत पोहोचले. त्यांनी साकारलेली शकुनी मामाची भूमिका चांगलीच गाजली. गुफी पेंटल यांनी 1975 साली 'रफू चक्कर' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. 80 च्या दशकात त्यांनी अनेक मालिकांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'जय कन्हैया लाल की' या मालिकेत गुफी यांनी शेवटचं काम केलं होतं. 
. गुफी पेंटल यांनी महाभारतासह कानून, सौदा, अकबर बीरबल, ओम नम: शिवाय, मिसेज कौशिक की पांच बहुएं, कर्ण संगिनी, जय कन्हैया लाल की या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच 'रफ्फू चक्कर', 'दिल्लगी', 'देस परदेस', 'मैदान-ए-जंग', 'दावा', 'द रिवेंज: गीता मेरा नाम', 'घूम', 'सम्राट अॅन्ड कंपनी' सारख्या सिनेमांत ते महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. 


गुफी पेंटल यांच्या निधनाबद्दल माहिती देताना त्यांचा पुतण्या हितेन पेंटलने एबीपी न्यूजला सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्याने गुफी पेंटल यांचे निधन झाले आहे. गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. त्यामुळे ते लवकरच घरी परत येतील, अशी कुटुंबियांना आशा होती. काही वर्षांपासून ते हृदय आणि किडनी संबंधित आजाराने ग्रस्त होते". 


गुफी पेंटल यांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी