बातम्या
कनेरकर चौक येथे बंदुक व बारा बोअर बंदुकीचे काडतुस जप्त
By nisha patil - 3/30/2024 8:04:30 PM
Share This News:
कोल्हापूर : प्रतिनिधी कनेरकर चौक, कोल्हापूर येथुन एका इसमाच्या ताब्यातुन विनापरवाना, बेकायदा बारा बोअरची सिंगल बॅरेल 01 बंदुक व बारा बोअर बंदुकीचे 01 जिवंत काडतुस व प्लेझर मोपेड असा एकूण 85,250/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची कारवाई
लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित
राहणेकरीता कोल्हापूर बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे इसमांना शोधून त्यांचेकडील
हत्यारे व दारूगोळा जप्त करून सदर इसमांचे विरूध्द कायदेशीर कारवाई करणेबाबत पोलीस
अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी आदेश दिले आहेत.
पोलीस अधीक्षक यांनी दिले आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस
निरीक्षक, रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कडील पोलीस पथके तयार
करुन माहिती घेत असताना दि. 30/03/2024 रोजी इसम नामे राहुल मोहन सुतार व.व.34, रा. प्लॉट
नं.6, राजोपाध्येनगर, सानेगुरूजी वसाहत, हा विनापरवाना, बेकायदेशीर गावठी बनावटीची बारा बोअरची सिंगल बॅरेल बंदूक व त्याकरीता लागणारे काडतूस कब्जात बाळगून कनेरकरनगर चौक, कोल्हापूर येथे येत असले बाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार दिपक घोरपडे यांना त्यांचे खात्रीशिर गोपनीय बातमी मिळाली.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अमंलदार हिंदुराव केसरे, बालाजी पाटील, ओंकार परब, अमित मर्दाने, तुकाराम राजिगरे असे कनेरकरनगर चौक, कोल्हापूर येथे जावून राहुल मोहन सुतार व व. 34, रा. प्लॉट नं. 6,
राजोपाध्येनगर, सानेगुरूजी वसाहत, कोल्हापूर यास ताब्यात घेवुन त्याचे कब्जातुन 85,250/-
रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये बारा बोअरची सिंगल बॅरेल 01 बंदुक, बारा बोअरचे 01 जिवंत
काडतुस व विना नंबरचे मोपेडसह ताब्यात घेतले आहे. त्याचे कब्जातील मिळालेला सर्व मुद्देमाल
जप्त करुन मुद्देमालासह त्यास ताब्यात घेवून पुढील कारवाईकरीता जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे
हजर केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत साो, मा. अपर पोलीस अधीक्षक
श्रीमती जयश्री देसाई साो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक
रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक
सागर वाघ तसेच पोलीस अमंलदार हिंदुराव केसरे, बालाजी पाटील, ओंकार परब, अमित मर्दाने,
तुकाराम राजिगरे यांनी केली आहे.
कनेरकर चौक येथे बंदुक व बारा बोअर बंदुकीचे काडतुस जप्त
|