खेळ

लोकनाथ चषक क्रिकेट स्पर्धेत गुरु स्पोर्ट्स संघ विजेता

Guru Sports Team Winner of Loknath Cup Cricket Tournament


By nisha patil - 12/2/2025 6:33:25 PM
Share This News:



लोकनाथ चषक क्रिकेट स्पर्धेत गुरु स्पोर्ट्स संघ विजेता

कसबा बावडा:-. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमत्त शिवसेना  राजेश क्षीरसागर फाउंडेशन आयोजित लोकनाथ चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गुरु स्पोर्ट्स विजेता, तर नवनाथ मित्रमंडळ प्रणित झेंडा चौक स्पोर्ट्स संघ उपविजेता ठरला. उपांत्य फेरीत अदिती वीरू पाटील प्रणित महालक्ष्मी स्पोर्ट्स आणि गोळीबार स्पोर्ट्स यांनी प्रवेश केला होता. कसबा बावडा पाव्हेलियन मैदानावर हि स्पर्धा दिवसरात्र खेळवण्यात आली. या स्पर्धेत थर्ड अंपायरचा वापर करण्यात आला. या स्पर्धेचे YouTube वरून थेट प्रेक्षेपण केले होते. या स्पर्धेत मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हामधील नामवंत संघाने सहभाग घेतला होता.
 

विजेत्या गुरु स्पोर्ट्स संघाला रोख १लाख २६,६६६ तर उपविजेत्या झेंडा चौक स्पोर्ट्स संघाला रोख ६६,६६६ बक्षिस देण्यात आले. तसेच सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली.

बक्षिस वितरण राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, कृष्णा लोंढे, प्रणव इंगवले, अमर साठे, राहूल उलपे, सूरज सुतार, सागर चव्हाण, रोहीत चव्हाण, राकेश चव्हाण, धवल मोहिते, विराज खाडे या मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.
स्पर्धेचे नियोजन आदर्श जाधव, रोहन उलपे, सचिन पाटील आणि आदित्य आळवेकर यांनी केले.


लोकनाथ चषक क्रिकेट स्पर्धेत गुरु स्पोर्ट्स संघ विजेता
Total Views: 36