बातम्या
मौनी महाराजांच्या अध्यात्मिक परंपरेचा उजाळा देणारी ज्ञानज्योत पाटगावात प्रज्वलित
By nisha patil - 8/2/2025 3:49:56 PM
Share This News:
मौनी महाराजांच्या अध्यात्मिक परंपरेचा उजाळा देणारी ज्ञानज्योत आज पाटगावमध्ये प्रज्वलित करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे मौनी विद्यापीठाचा अध्यक्ष या नात्याने आ.सतेज पाटीलांच्या हस्ते या परंपरेची सुरवात करण्यात आलीय. यावेळी बोलताना आ.सतेज पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे या ज्ञानज्योत प्रज्वलित करण्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहता येते माझे भाग्य समजतो. पाटगावात प्रज्वलित होणारी ज्योत केवळ एक धार्मिक परंपरा नसून, ज्ञानप्रसाराचा वारसा पुढे नेण्याचे प्रतीक आहे.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची आणि अध्यात्माची गंगा पोहोचवण्याचा संकल्प या मौनी महाराजांच्या ज्ञानज्योतीतून प्रकट होतो. मौनी महाराजांचा इतिहास त्यांच्या समाधीपुरताच मर्यादित नसून तो एक प्रेरणादायी प्रवास आहे. मुळचे उत्तूरचे आणि पाटगावामध्ये स्थायिक झालेले मौनी महाराज यांनी आपल्या मौनातून आध्यात्मिक कार्य केले. आजच्या या चैतन्यदायी सोहळ्याला संजय बेनाडीकर सरकार, दिलीप बेनाडीकर सरकार, महेंद्र बेनाडीकर सरकार, राजू काझी, बाळासो गुरव, प्रा. उदय शिंदे सरपंच अनिल सावंत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
मौनी महाराजांच्या अध्यात्मिक परंपरेचा उजाळा देणारी ज्ञानज्योत पाटगावात प्रज्वलित
|