बातम्या

हणमंतवाडी गावाचा विकास करणार- सरपंच तानाजी नरके

Hanamantwadi village will be developed by Sarpanch Tanaji Narake


By nisha patil - 2/25/2024 10:07:09 PM
Share This News:



हणमंतवाडी गावाचा विकास करणार- सरपंच तानाजी नरके

मा.आम.चंद्रदीप नरके यांनी ६० लाखांचा निधी हणमंतवाडी गावासाठी दिला

करवीर :  हनुमंतवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी पाठपुरावा करणार असून राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नूतन सरपंच तानाजी नरके यांनी हॅलो प्रभात शी बोलताना सांगितले. नरके आणि यावेळी गावातील रस्ते, गटर्स, पटांगण, कामे पूर्ण करण्यासाठी माजी आमदार चंद्रदिप नरके यांच्या पाठपुराव्याने करणार असल्याचे सांगून यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. हनुमंतवाडी गाव मॉडेल बनण्यासाठी वेगळ्या पद्धतीने कामकाज करण्यात येईल. याआधीही कामे झालेले आहेत आणि राहिलेली  कामे तसेच जनतेच्या समस्या समजावून घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे नरके यांनी सांगितले.
 

मा.आम.चंद्रदीप नरके यांनी सत्कार करताना ६० लाखांचा मुख्य रस्ता ४० लाख व अंतर्गत रस्ते २० लाख मंजूर करण्यात आले. लवकरच याचे उदघाटन करण्यात येणार असल्याचे सांगितले.  यावेळी नुतन सरपंच तानाजी नरके यांच्या निवडीनिमित्ताने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला होता. उपसरपंच निता नरके, माजी सरपंच उद्योगपती संजय जाधव, संग्राम भापकर, कविता जाधव, संगीता शिनगारे, समृद्धी पाटील, सरदार नरके, दिलीप खिलारी, बाबुराव नरके,  ,राजेंद्र नरके, आधी पदाधिकारी उपस्थित होते.


हणमंतवाडी गावाचा विकास करणार- सरपंच तानाजी नरके