बातम्या
तारा न्यूज कडून गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा
By nisha patil - 9/4/2024 8:46:49 AM
Share This News:
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारली जाते. गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. या दिवशी ब्रम्हध्वज आणि विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. या दिवसापासून शके १९४६ आणि नव संवत्सर २०८१ प्रारंभ होईल. शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. गुढीपाडवा म्हणजे हिंदुनववर्ष सर्वांना शुभ जाओ आणि अडचणीमुक्त राहो यासाठी हे खास शुभेच्छा
नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र,
तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या,
कडुनिंबाची पानं, साखरेची माळ,
अशी उभारूया समृद्धीची गुढी.
नववर्षाभिनंदन.
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
तारा न्यूज कडून गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा
|