बातम्या

हर हर शँभो गायिकेच्या भावाची हत्त्या

Har Har Shambho Singers Brother Murdered


By nisha patil - 8/8/2023 5:04:05 PM
Share This News:



खुर्शीद असं मृत तरुणाचं नाव असून तो गायिका फर्मानी नाझ यांचा चुलत भाऊ आहे. खुर्शीद १९ वर्षांचा होता.गेल्या शनिवारी बाईकवरुन आलेल्या तिघा अज्ञातांनी खुर्शीदची चाकूनं वार करुन हत्या केली. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये ही घटना घडली. त्या तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. सध्या पोलिसांकडून हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रतनपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोहम्मदपूर माफी गावात ही घटना घडली. आरोपींनी खुर्शीदवर चाकूनं अनेक वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला नातेवाईकांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यानं अखेरचा श्वास घेतला.


हर हर शँभो गायिकेच्या भावाची हत्त्या