बातम्या

हार्दिक पांड्याच्या सपोर्टमध्ये उतरला

Hardik came in support of Pandya


By nisha patil - 3/30/2024 8:05:14 PM
Share This News:



मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक सामन्यावेळी कर्णधार हार्दिक पांड्या  ट्रोल होत आहे. रोहित शर्माच्या चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला ट्रोल करण्यात येत आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होण्याआधीच चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला  ट्रोल करण्यात येत होतं. मुंबई इंडियन्सला पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे चाहत्यांनी पांड्याला आणखी ट्रोल केले. मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद संभाळल्यानंतर हार्दिक पांड्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. पण आता हार्दिक पांड्याच्या सपोर्टमध्ये भारताचा स्टार अष्टपैलू रविचंद्रन अश्विन  उतरला आहे. हे काही पहिल्यांदाच झालेले नाही, अशा शब्दात अश्विनने हार्दिकचा सपोर्ट केला आहे.


हार्दिक पांड्याला स्टेडियममध्ये केले जाणाऱ्या हुटिंगविरोधात आर. अश्विनने नाराजी व्यक्त करत चाहत्यांना स्पष्ट शब्दात सुनावे आहे. अश्विन म्हणाला की, तुम्हाला  जर एखादा खेळाडू आवडत नसेल, त्या खेळाडूचा राग येत असेल अथवा तिरस्कार असेल, तर एखादा वरिष्ठ खेळाडू ज्युनियर खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळतोय, ही काही पहिली वेळ नाही. पणआपण असं दाखवत आहेत की असं यापूर्वी कधीही झालं नाही. सचिन तेंडुलकरही सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळला आणि सचिन आणि राहुल हे दोघेही राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळले, तर हे तिघंही अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली खेळले. एकेकाळी हे सर्व एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळले. जेव्हा ते धोनीच्या नेतृत्वाखाली खेळते होते, तेव्हा ते सर्व दिग्गज खेळाडू होते.  


हार्दिक पांड्याच्या सपोर्टमध्ये उतरला