बातम्या
एनपीए वाढीतून डॉक्टरांचा प्रश्न सुटेल : हसन मुश्रीफ
By nisha patil - 1/1/2024 2:52:26 PM
Share This News:
एनपीए वाढीतून डॉक्टरांचा प्रश्न सुटेल : हसन मुश्रीफ
गडहिंग्लज: वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य या दोन्ही विभागात मनुष्यबळाची अडचण आहे. स्वतःच्या प्रॅक्टिस मधून अधिक उत्पन्न मिळत असल्याने शासकीय रुग्णालयाच्या सेवेत डॉक्टर्स येत नाहीत. यावर मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाने समिती नेमली आहे. एनपीए ( नोन प्रॅक्टिसिंग अलाउन्स) वाडीतून डॉक्टरांचा प्रश्न सुटेल असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
उपजिल्हा रुग्णालयात नव्याने उभारलेले शंभर बेड फील्ड हॉस्पिटल व सिटी स्कॅन मशीनचा लोकार्पण कार्यक्रम झाला या प्रसंगी मुश्रीफ बोलत होते. काजल संजय मंडलिक आमदार राजेश पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मुश्रीफ म्हणाले, उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचारी निवासस्थान दुरुस्तीसह अन्य कामासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी दिला जाईल. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयात एम आर आय पॅथॉलॉजीची सुविधा आहे. उपजिल्हा रुग्णालयातही पिपिपी तत्वावर एमआयआयची सुविधा उपलब्ध केली जाईल.
खासदार मंडलिक म्हणाले, पूर्वी उपचार म्हणजे की मिरज असे समीकरण होते. आता गडिंग्लज आणि त्यातही उपजिल्हा रुग्णालयाचा रुग्णांना आधार आहे. माझ्या निधीतून या रुग्णालयात एक कोटी रुपयांची कामे केली आहेत.
यानंतर आमदार राजेश पाटील म्हणाले, उपजिल्हा रुग्णाला प्रमाणेच दुर्गम डोंगराळ भागातील ग्रामीण रुग्णालयातही ,डायलिसिस, सिटीस्कॅन ची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. महेश सलवादे यांचेही भाषण झाले.
यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी प्रास्ताविक केले. गोडसाखर चे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, वसंत यमगेकर, किरण कदम ,सिद्धार्थ बनणे, नागेश चौगुले ,अभय देसाई ,सुरेश कोळकी, ॲड. दिग्विजय कुराडे, प्रांत अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, गटविकास अधिकारी शरद मगर, अतिरिक्त आरोग्य अधिकारी. डॉ. संजय रणवीर, क्रस्ना डायग्रोस्टीकचे कार्यकारी संचालक यश मुथा, उपजिल्हा चे वैद्यकीय अधीक्षक, डॉ. गीता कोरे, डॉ.दिलीप आंबोळे, आदी उपस्थित होते. डॉ. स्वाती कमल यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा शल्य चिकस्तक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी आभार मानले.
एनपीए वाढीतून डॉक्टरांचा प्रश्न सुटेल : हसन मुश्रीफ
|