बातम्या
कोल्हापुरात पुर निर्माण करतील असे पुल तयार होणार नाहीत हसन मुश्रीफ
By nisha patil - 2/12/2023 4:42:03 PM
Share This News:
कोल्हापूर पावसाळ्यात महापुरात पंचगंगा नदी पात्राजवळ नवीन पुल करताना टाकलेल्या भराव्यामुळे निम्मे शहर पाण्यातबुडाले यामुळे कोल्हापूरच्या जनतेने तीव्र नाराजी व्यक्त करून याबाबत प्रशासनास सूचना केल्या होत्या. यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले ," या पुलाबाबत मी व तात्कालीन पालकमंत्री बंटी पाटील यांनी कराड,कोल्हापूर येथे बैठक घेतली. तसेच पाहणी करून पुराचे पाणी येऊन अडचण निर्माण होणार नाही. यासाठी पूल पिल्लर चे बांधण्यासाठी संबधितांना कळविले होते."
पालकमंत्री हसनमुश्रिफ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याना फोनवरून कोल्हापुरतील महापूर व त्यासंदर्भातील सूचना या घटनांचा संदर्भ दिला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तात्काळ बांधकाम राष्ट्रीय चेअरमन संतोष जाधव,अंशानु श्रीवास्तव यांना फोनवरून याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कोल्हापुरात पूल बांधताना , पुल भराव्याऐवजी पिल्लर चे पूल बांधकाम होईल महापूर आला तर पुलामुले शहराला धोका होणार नाही.असेही त्यांनी यावेळी सांगितले.तसेचपूर्वी झालेल्या बांधकामामुळे कोल्हापूरकराची झालेल्या महापुराच्या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली अशी माहिती आज मंत्री हसनमुश्रिफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापुरात पुर निर्माण करतील असे पुल तयार होणार नाहीत हसन मुश्रीफ
|