बातम्या
जिल्हाधिकार्यालयात जनता दरबार मध्ये हसन मुश्रीफ यांची बैठक...
By nisha patil - 4/12/2023 7:28:18 PM
Share This News:
जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याला पहिल्या सोमवारी भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न तातडीने निकाली होत असल्याने आपल्याला समाधानकारक वाटत असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. आज दाखल झालेल्या सुमारे ५०० अर्जांवर तातडीने एका महिन्याच्या आत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून जर अर्ज निकाली निघत नसेल तर त्याची कारणेही लेखी स्वरूपात संबंधित विभागाला द्यावी लागतील असे निर्देश मुश्रीफ यांनी जनता दरबारात दिले.या जनता दरबारावेळी जिल्हाधिकारी राहुलरेखावार, आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील,जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत छत्रपती प्रमिलाताई राजे चे डॉ. प्रकाश गुरव तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख, अधिकारीवर्ग जनता दरबारामध्ये नागरिकांनी चांगला प्रतिसाद दाखविला. यावेळी नागरिकांनी आपली निवेदने, अडचणी, समस्या याबाबतचे अर्ज मंत्री व जिल्हा प्रशासनासमोर सादर केले. जनता दरबारात अर्जांवर चर्चा करून मंत्री महोदयांनी संबंधित विभागासते अर्ज वर्ग करून तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक निर्देशही दिले.
जिल्हाधिकार्यालयात जनता दरबार मध्ये हसन मुश्रीफ यांची बैठक...
|