बातम्या
शिवाजी विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेत शहाजी महाविद्यालयाची हट्रिक
By nisha patil - 12/26/2024 10:58:36 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेत शहाजी महाविद्यालयाची हट्रिक
दिनांक : 23 डिसेंबर 2024 रोजी डी वाय पाटील मेडिकल कॉलेज येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेमध्ये दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या महिला क्रिकेट संघाने सांगली, सातारा व कोल्हापूर संघाबरोबर विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
सन 2022-23, सन 2023-24 आणि या वर्षी सन 2024-25 असे सलग तिसऱ्यांदा शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक विजेता श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय मुलींचा संघ ठरला. या स्पर्धेमध्ये कर्णधार सौम्यलता बिराजदार, उपकर्णधार सानिका लाड, स्नेहा साळे, सिद्धी चव्हाण व साक्षी पाटील यांनी चमकदार कामगिरी केली. त्यांची निवड उदयपूर येथे होणाऱ्या अंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी झाली.
सर्व विजेत्या खेळाडूंना श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. मानसिंग विजयराव बोंद्रे(दादा), संस्थेचे रजिस्ट्रार श्री. रुपेश खांडेकर, प्राचार्य डॉ.आर के. शानेदिवाण, रजिस्ट्रार श्री.रवींद्र भोसले, अधीक्षक श्री.मनीष भोसले, जिमखाना प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, क्रीडा शिक्षक प्रा. प्रशांत मोटे, तसेच प्रशिक्षक श्री सरदार पाटील या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शिवाजी विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेत शहाजी महाविद्यालयाची हट्रिक
|