बातम्या
दहावीच्या उत्तरपत्रिकेत हटके डायलॉग
By surekha -
Share This News:
दहावीच्या उत्तरपत्रिकेत हटके डायलॉग
दहावी-बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांमध्ये काहीतरी हटके लिहण्याचे प्रकार यंदाही पाहायला मिळाले आहे. ही हटके उत्तरे पाहून शिक्षण मंडळाने देखील डोक्याला हात मारून घेतला आहे. कुणाच्या उत्तरत्रिकेत खाणाखुणा पाहायला मिळत आहे, तर कोणी मोबाईल क्रमांक लिहला आहे. तर मला पास करा अन्यथा आत्महत्या करेल असेही लिहण्यात आले आहे. एवढ्यावरच न थांबता काही विद्यार्थ्यांनी तर चक्क पुष्पा चित्रपटातील, झुकेगा नहीं साला असे डायलॉग लिहिले आहे. त्यामुळे अशाप्रकारे आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोटीसा देऊन सुनावणीसाठी बोलावले जात आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारे आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 500 आहे.चक्क उत्तरपत्रिकांमध्ये...
“सर कृपया मला पास करा, नाहीतर घरचे लग्न लावून देतील.त्यामुळे तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि मला पास करा.” "पास नाही झालो तर वडील खूप मारतील, सर प्लीज मला पास करा.”
"सर मला परीक्षेत पास नाही केलं तर मला आत्महत्या करावी लागेल. त्यामुळे मला आत्महत्या करण्यापासून वाचवा. मला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडू नका सर..”विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे भावनिक भाषा वापरली असली, तरीही बोर्डाकडून मात्र हे खपवून घेतले जाणार नसल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. याबाबत विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांनी प्रतिक्रिया दिली असून, विद्यार्थ्यांनी आपल्याला पास करावे म्हणत उत्तरपत्रिकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लिखाण केले आहे. पण उत्तरपत्रिकांमध्ये उत्तराच्या व्यतिरिक्त काहीही लिखाण करणे आक्षेपार्ह समजले जाते. तर प्रत्येक कृतीसाठी मंडळाची काही नियमावली असून, त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचा अनिल साबळे म्हणाले आहेत.
Hatke dialogue in 10th answer sheet
|