बातम्या

तुम्ही कधी पांढरा कांदा खाल्ला आहे का?

Have you ever eaten white onion


By nisha patil - 6/23/2023 7:16:11 AM
Share This News:



तुमच्यापैकी बहुतेकांना कांद्याशिवाय जेवण जात नाही. कांदा हा आपल्या स्वयंपाकघरातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ज्याशिवाय अनेक पाककृतींची चव बदलते.

यामुळेच भारतात कांद्याला जेवणात खूप जास्त महत्त्व आहे. तो जेवणाची केवळ चवच वाढवत नाही तर आरोग्यालासाठी अनेक प्रकारे फायदे मिळवून देतो. कांद्याचा वास उग्र असतो, त्यामुळे अनेकांना तो खायला आवडत नाही, परंतु तो अनेक गंभीर आजारांपासून आपले संरक्षण करतो, हे नाकारता येत नाही. पण तुम्ही कधी पांढरा कांदा खाल्ला आहे का? याचे फायदे जाणून तुम्हीही पांढरा कांदा खाण्यास सुरुवात कराल.

पांढऱ्या कांद्याचे फायदे

पांढऱ्या कांद्याचे उत्पादन सामान्य कांद्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे बाजारात तो कमी दिसतो. त्यामुळे सामान्य लाल कांद्यापेक्षा त्याचा दर थोडा जास्त आहे. परंतु आरोग्याच्या फायद्यांचा विचार केला तर पांढऱ्या कांद्याचे महत्त्व खूप वाढते. हा पांढरा कांदा खाण्याचे फायदे जाणून घ्या.

शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत

पांढरा कांदा मधुमेहाच्या रुग्णांसाठी औषधापेक्षा कमी नाही. कारण तो नियमित खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित  ठेवण्यास खूप मदत होते.

कॅन्सर रुग्णांसाठी वरदान

कॅन्सर हा एक अत्यंत गंभीर आजार आहे. जर तो सुरुवातीच्या टप्प्यात आढळला नाही तर तो प्राणघातक ठरु शकतो. यापासून बचाव करण्यासाठी पांढरा कांदा खावा कारण त्यात फ्लेव्होनॉइड अँटीऑक्सिडंट असतात. जे कर्करोगाशी लढण्यास मदत करतात. तुम्ही कांदे कच्चे किंवा शिजवलेले दोन्ही प्रकारे खाऊ शकता.

पचनशक्ती वाढीला मदत

पांढरा कांदा खाल्ल्याने पचनाशी निगडीत समस्यांशी लढण्यास मदत होते. म्हणूनच बहुतेक वेळा सॅलडमध्ये त्याचा समावेश केला जातो. पांढऱ्या कांद्यामध्ये भरपूर फायबर आणि प्रीबायोटिक्स असतात. जे आपल्या पोटासाठी फायदेशीर असतात. पांढरा कांदा चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतो. ज्यामुळे पचन सुधारते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत

आपले आरोग्य हे रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून आहे. आपली प्रतिकारशक्ती वाढवली तर आपण अनेक प्रकारच्या संसर्गापासून सुरक्षित राहू शकतो. पांढरा कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळे रोजच्या आहारात त्याचा समावेश करणे आवश्यक आहे.


तुम्ही कधी पांढरा कांदा खाल्ला आहे का?