बातम्या

अल्पवयीन पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवणे बलात्कार नाही.

Having physical relations with a minor wife is not rape


By nisha patil - 8/23/2023 7:34:55 PM
Share This News:



मुलगी अल्पवयीन असल्याच्या कारणातून सासूने जावयाला धडा शिकवण्यासाठी दिल्ली हायकोर्टात  कायदेशीर लढाई सुरु केली होती. मात्र  मुलगी अल्पवयीन असली तरी तिने आपल्या  मर्जीने लग्न केले होते. यामुळे अल्पवयीन पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवणे बलात्कार नाही, असा निष्कर्ष काढत हायकोर्टाने पतीची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. 15 वर्षाच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून गरोदर केल्याप्रकरणी मुलीच्या न्यायासाठी दिल्ली हाय कोर्टात   खटला  सुरु होता . न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने पतीची निर्दोष मुक्तता केली  आहे. 

15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी लग्न करून  शारिरीक संबंध. ठेवल्याच्या आरोपावरून  पतीवर बलात्काराचा गुन्हा  दाखल झाला होता.   मुलगी अल्पवयीन असली तरी तिचे आरोपीशी लग्न झाले होते. लग्नानंतरच दोघांनी शारिरीक संबंध ठेवल्याचे न्यायालयात  स्पष्ट  झाले होते.   दोघांचा विवाह झाल्याचे विचारात घेता अल्पवयीन पत्नीशी प्रस्थापित केलेल्या शारिरीक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही.  अशा वेळी मुलीचा जबाब ग्राह्य धरून दिल्ली उच्च न्यायालयाने आरोपी पतीची निर्दोष मुक्तता केली आहे.


अल्पवयीन पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवणे बलात्कार नाही.