बातम्या
पदार्पणातच बनला बॉलिवूड सुपरस्टार, 30 हजार मुलींनी केलं प्रपोज
By nisha patil - 5/12/2023 11:00:46 PM
Share This News:
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते हे त्यांच्या अभियनामुळे तर कोणी गुड लूक्समुळे नावजले जातात आणि खूप लोकप्रियही होतात. मात्र 2000 साली अशा एका अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं जो गुड लूकिंग तर होताच, पण अभीनयामध्ये ही निपुण होता. त्याचा पदार्पणातील चित्रपटच एवढा हिट ठरला की तो सुपरस्टार बनला आणि बॉलिवूडवर अधिराज्य गाजवू लागला.त्या सुपरस्टारची सर्वत्र चर्चा होती. मुलींमध्ये तर त्याची क्रेझ प्रचंड होती. त्याचा पदार्पणातील चित्रपट पाहून मुली त्याच्यासाठी इतक्या वेडावल्या की बघता-बघता त्याच्याकडे लग्नाची बहुसंख्य प्रपोजल्स आली. त्या अभिनेत्याला फक्त 100-200 नव्हे तब्बल 30 हजार मुलींनी लग्नासाठी प्रपोज केलं होतं. आणि याचा खुलासा खुद्द त्या अभिनेत्यानेच द कपिल शर्मा शो मध्ये केला होता.
हा सुपरस्टार दुसार तिसरा कोणी नसून, तो आहे हृतिक रोशन 2000 साली आलेल्या ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून हृतिकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यामध्ये त्याच्यासोबत अमिषा पटेल मुख्य भूमिकेत झळकली. विशेष म्हणजे कहो ना प्यार है चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर 80 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर 14 फेब्रुवारीला, व्हॅलेंटाइन्स डे च्या दिवशी हृतिकला सुमारे 30 हजार मुलींनी लग्नासाठी प्रपोज केलं होतं.
असंख्य तरूणीच्या हृदयावर राज्य करणाऱ्या हृतिकने त्या सर्व मुलींचं मनं मोडून, त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड सुझान खानसबोत लग्न केलं. दोघांना दोन मुलंही आहेत. पण 2014 साली हृतिक आणि सुझानने होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी घटस्फोटाची घोषणा केल्याने त्यांचे चहा त्यांना मात्र मोठा धक्का बसला. सध्या सुझान ही अर्सलान गोनी याला डेट करत आहे. तर हृतिक हा त्याच्यापेक्षा लहान असलेली, अभिनेत्री सबा आझाद हिला डेट करतोय
हृतिकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘फायटर’ चित्रपटात दीपिका पडूकोणसोबत तो .झळकणार आहे
पदार्पणातच बनला बॉलिवूड सुपरस्टार, 30 हजार मुलींनी केलं प्रपोज
|