बातम्या

डोकेदुखी!

Headache


By nisha patil - 3/26/2024 9:41:30 AM
Share This News:



डोके दुखण्याची अनेक कारणे असू शकतात. बहुतेक वेळा मर्यादित काळापुरतीची डोकेदुखी गंभीर नसते. अशा गंभीर नसणाऱ्या प्रकारापैकी स्नायूत तणाव निर्माण झाल्याने जाणवणारी डोकेदुखी हा प्रकार प्रत्येक माणसाने केव्हा ना केव्हातरी अनुभवलेला असतो. याला ‘टेंशन हेडएक’ म्हणतात. कपाळ, कानावरचा कवटीचा भाग, मानेच्या वर या भागात एखादा पट्टा आवळला जावा अशा प्रकारचे दुखणे असते.

सामान्य डोकेदुखी ची कारणे.-

* पोटसाफ नाही ,अपचन,पित्ताचा त्रास.
* पोटात भुक असणे.
* झोप पूर्ण न झाल्यामुळे ही डोकेदुखी होऊ शकते.
* ग्लुकोजचे प्रमाण कमी होणे
* दातांच्या दुखण्याने देखील डोकेदुखी होऊ शकते. दातांचे किडणे, अक्कलदाढ या समस्या ही असू शकतात.
* तणाव, थकवा येणे ही सुध्दा तणावाची कारणे असू शकतात. 
* चष्म्याचा नंबर बदलल्यामुळे डोकेदुखी होते.
ज्यांना डोळ्यांचा चष्मा लागलेला नसेल व डोकेदुखीचा त्रास होत असेल त्यांनी अवश्य नेत्ररोगतज्ज्ञाकडे जाऊन डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.
* कधी कधी काही औषधे देखिल डोकेदुखीला कारण ठरू शकतात. उदा. हृदयरोगावरील व उच्च रक्तदाबासाठी घेतली जाणारी औषधे.
* मायग्रेन नावाची डोकेदुखी अनुवंशिक असते. यात डोक्याचा अर्धाच भाग दुखतो. याचे कारण कोणत्याही खाण्याच्या पदार्थाची एलर्जी हे असू शकते.
* सर्दीचा कायमस्वरूपी त्रास असणे, ऋतूत झालेला बदल, अधिक धुम्रपान इ. कारणांनीही डोकेदुखीची तक्रार असू शकते.
* पूर्ण दिवस एका बंद रूममध्ये राहिल्याने शरीराला शुध्द हवा मिळू शकत नाही. यामुळेदेखिल डोकेदुखी होऊ शकते.
* आज संगणक युगात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण तासंतास संगणकासमोर बसून असतात. यामुळेही डोकेदुखी होते. जास्त वेळ टिव्ही पाहणे डोकेदुखीस कारण ठरू शकते.

गंभीर आजारातील डोकेदुखी-

* रक्तवाहिन्यांचे दोष – गुठळया, रक्तस्राव, इ.
* मेंदूचे जंतुदोष – उदा मेंदूज्वर, मेंदूआवरण दाह, मेंदू-हिवताप, *कर्करोग – मेंदूतल्या गाठी
* इजा – मार
* डोळा-कान, दात, मान, इ. अवयवांशी संबंधित डोकेदुखी
* इतर संस्थांचे आजार उदा. फ्लू, डेंगू, अतिरक्तदाब, काचबिंदू, सायनसदुखी.
* मेंदूच्या चेतांशी निगडित डोकेदुखी, मानदुखी
मात्र या आजारामुळे डोकेदुखी असल्यास डाँक्टर ना भेटा आजार अंगावर काढू नका.

 


डोकेदुखी!