बातम्या

काळी मिरी तेलाचे आरोग्यासाठी होणारे फायदे! वाचा..

Health Benefits of Black Pepper Oil


By nisha patil - 8/19/2023 8:42:31 AM
Share This News:



काळी मिरी हा भारतातील जवळपास प्रत्येक घरात आढळणारा मसाला आहे, त्याच्या वापराने जेवणाची चव वाढते. पण तुम्ही कधी काळी मिरी तेलाचं नाव ऐकलं आहे का? या तेलात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात.

चला तर मग जाणून घेऊया या तेलाच्या मदतीने तुम्ही कोणत्या
समस्यांपासून
मुक्त होऊ शकता.

काळी मिरी तेलाचे फायदे

काळी मिरी तेलात अतिसार विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे अतिसार, गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या कमी होतात. त्यामुळे हे आवश्यक तेल जरूर वापरावे.
उच्च कोलेस्ट्रॉल ही सध्या एक मोठी समस्या बनत चालली आहे. जर आपण काळी मिरी तेलाचे सेवन केले तर एलडीएलची (LDL) पातळी कमी होईल आणि एचडीएलची (HDL) पातळी वाढेल.
भारतात हृदयरुग्णांची संख्या खूप जास्त आहे, म्हणूनच आपण खूप सतर्क राहण्याची गरज आहे. काळी मिरीचे तेल उच्च रक्तदाब रोखते, ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यासारख्या जीवघेणा आजारांचा धोका टळतो
काळी मिरी तेल लावल्याने स्नायूंना आराम तर मिळतोच, शिवाय मानसिक आरोग्यासाठीही ते खूप फायदेशीर मानले जाते. ब्लॅक पेपर ऑइलच्या मदतीने टेन्शन दूर करता येते.


काळी मिरी तेलाचे आरोग्यासाठी होणारे फायदे! वाचा..