बातम्या

कोरगांवकर हायस्कूलमध्ये कुष्ठरोगविषयक आरोग्य तपासणी

Health Checkup on Leprosy in Korgaonkar High School


By nisha patil - 7/20/2024 9:52:48 PM
Share This News:



बोरपाडळे / प्रतिनिधा सदर बाजार येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगांवकर हायस्कूलमध्ये शासनाच्या कुष्ठरोग मोहिमे अंतर्गत इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी या वर्गातील विदयार्थी-विद्यार्थीनींची कुष्ठरोगविषयक आरोग्य तपासणी करण्यात आली . पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग तपासणी पथक    शेंडापार्क येथील वैद्यकीय सहाय्यक एम. बी. पाटील आणि आशा सेविका जयश्री साळवे यांनी प्रशालेतील ५३० विद्यार्थ्यांची तपासणी केली . प्रारंभी वैद्यकीय सहाय्यक एम. बी. पाटील यांनी कुष्ठरोग निर्मूलन विषयक शपथ विद्यार्थ्यांकडून घेतली. मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी कुष्ठरोग समज आणि गैरसमज याबद्दल माहिती दिली . अनिल चव्हाण, सतिश नंदनवार, रणधीर मिरजकर यांनी संयोजन केले . पर्यवेक्षिका प्रमिला साजणे यांनी आभार प्रदर्शन केले . यावेळी हेमलता पाटील, सदाशिव  -हाटवळ, तृप्ती रावराणे, सुरेखा पोवार आदी मान्यवर उपस्थित होते .


कोरगांवकर हायस्कूलमध्ये कुष्ठरोगविषयक आरोग्य तपासणी