बातम्या
आरोग्यम् धनसंपदा! दूधात दालचिनी पावडर मिसळा, 'या' रोगांपासून राहाल दूर
By nisha patil - 12/6/2023 7:29:28 AM
Share This News:
आपल्याला अनेक पौष्टिक आहारातून प्रचंड प्रमाणात फायदे मिळतात. त्यातलाच एका पदार्थ म्हणजे दालचिनीचे दूध. लवंगाच्या दूधाचे एक नाही तर अनेक फायदे आहेत.
त्यामुळे आपल्याला शरीराला या पदार्थाचा चांगला आरोग्यदायी फायदा होता. या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की दालचिनीच्या दूधाचे आपल्याला कोणते कोणते फायदे होतात. खरंतर आपल्या दातांच्या आरोग्यासाठी चांगलीच फायदेशीर असते. परंतु त्याचसोबत लवंग आणि दालचिनी ही उष्णही असते त्यामुळे आपल्याला ती जपूनही खावी लागते. परंतु फक्त दातांच्या आरोग्यासाठीच नाही तर दालचिनीचे आपल्याला अनेक प्रकारे फायदे मिळतात. त्यातून दालचिनीच्या दूधाचेही अनेक फायदे आहेत जे तुम्हाला माहितीही नाही.
दालचिनीचा वापर आपण आपल्या जेवणात स्वादिष्ट चव येण्यासाठीही करतो. त्यामुळे आपल्यालाही त्यामुळे चमचमीत आणि मसालेदार पदार्थ हे खाता येतात. मसाले भातासाठी आपण खासकरून दालचिनी, लवंग वापरतो. परंतु तुम्ही दालचिनीची पावडर तयार करून ती दुधात मिसळू शकता आणि त्याचेही सेवन करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्याचे एक नाही तर अनेक फायदेही मिळतील. आपल्याला याचे अनेक फायदे मिळतात मुळात, यातून आपल्याला कॅल्शियम, प्रोटीन, मिनरल आणि व्हिटॅमिन यांचे भरपूर प्रमाण मिळते. तेव्हा तुम्हाला मिळणाऱ्या फायद्यांमुळे तुम्हालाही सृदृढ आणि निरोगी आयुष्य मिळेल.
मुरमं बरी होतात - दालचिनीचे दूध प्यायल्यानं तुम्हाला जर का मुरूमांचा त्रास होत असेल तर तो बरा होतो. रोज सकाळी तुम्ही दालदिनीचे दूध पिऊ शकतात.
डायबेटिजच्या पेशंट्ससाठी - मधुमेहाच्या पेशंट्ससाठी दालचिनीचे दूध फायदेशीर ठरते. टाईप 2 डायबेटिजच्या पेशंट्ससाठी हे दूध फायदेशीर असते. त्यातून तुमची ब्लड शुगरही कमी राहते.
पिगमेंटेशनसाठी फायदेशीर - या दूधात तुम्हाला अमिनो एसिड आणि लॅक्टिक एसिडचा फायदा मिळतो. त्यातील एंटी-बॅक्टेरियल गुणांमुळे त्वचेला फायदा होतात. पिंपल्स येत नाहीत. सनबर्न, टॅनिंगपासूनही हे तुमचे रक्षण करते.
कोलेस्ट्रॉल कमी - आपल्याला कुठल्याही प्रकारचा हृदयरोग होत नाही. रोज एक ग्लास दूध प्यायल्यानं तुम्हाला याचा चांगला फायदा होऊ शकतो. तसेच कोलेस्ट्रॉलही कमी होते.
वजन कमी करण्यास फायदेशीर - यामुळे तुमचे वजनही कमी होण्यास मदत होते. तेव्हा या दूधाचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
आरोग्यम् धनसंपदा! दूधात दालचिनी पावडर मिसळा, 'या' रोगांपासून राहाल दूर
|